जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कोरोनामुळे सेलिब्रेटी बसलेत घरी पण शेवंता मात्र रमली आहे या कामात, पाहा VIDEO

कोरोनामुळे सेलिब्रेटी बसलेत घरी पण शेवंता मात्र रमली आहे या कामात, पाहा VIDEO

रात्रीस खेळ चाले या मालिकेत काशीचा जीव तर वाचला. आता गावात होळी साजरी करणं सुरू आहे.

रात्रीस खेळ चाले या मालिकेत काशीचा जीव तर वाचला. आता गावात होळी साजरी करणं सुरू आहे.

अपूर्वा सध्या ‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 मार्च : कोरोना व्हायरसमुळे सध्या सर्वकाही ठप्प झालं आहे. संपूर्ण देशात या व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता भारत सरकारनं लॉकडाउन केलं आहे. त्यामुळे सामान्य व्यक्तीपासून ते सेलिब्रेटीपर्यंत सर्वच घरी बसून आहे. दरम्यान सर्व सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. पण काही सेलिब्रेटी मात्र त्यांच्या कुटुंबाला वेळ देताना दिसत आहेत. सर्वांची लाडकी शेवंता सुद्धा सध्या अशीच कुटुंबात रमलेली दिसत आहे. ‘रात्रीस खेळ चाले 2’ या झी मराठीवरील मालिकेतून घराघरात पोहोचलेली शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा सोशल मीडियावर तगडा चाहता वर्ग आहे. सध्या अपूर्वाच्या मालिकेच शूटिंग थांबल्यानं ती सुद्धा घरी आहे. त्यामुळे ती सध्या तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवून खायला घालत आहे. नुकताच तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती गाजरचा हलवा बनवताना दिसत आहे. ‘सॉरी उद्धवजी… मला तुमची माफी मागायचीय’ मुख्यमंत्र्यांकडे अभिनेत्याचा माफीनामा

जाहिरात

अपूर्वानं तिच्या इन्स्टाग्रामवर किचनमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती गाजरचा हलवा बनवताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, ‘म्युझिक + कुकिंग = माझा आनंद. गाजरचा हलवा’ सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. Lockdown 21 Days : रिंकू सध्या काय करते माहित आहे का? पाहा VIDEO

अपूर्वा सध्या ‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. याआधीही अपूर्वानं काही मालिकांमध्ये काम केलं होतं मात्र तिला खरी ओळख मिळाली ती ‘रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतून. सध्या कोरोना व्हायरसमुळे या मालिकेचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. लॉकडाउनमध्ये गुढीपाडवा सेलिब्रेशनवर सोनाली बेंद्रे म्हणते, ‘हा उपहास आहे की…’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात