मुंबई, 26 मार्च : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अमिर खान (Amir Khan) आपल्या आगामी लालसिंग चड्ढा या चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. त्याचवेळी आमिर खानची मुलगी इरा खान (Ira Khan) देखील काही कमी नाही. तीदेखील कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. इराने अद्याप चित्रपटात पदार्पण केले नसले तरी इंडस्ट्रीच्या या स्टार किडची फॅन फॉलोइंग सुपरस्टारपेक्षाही काही कमी नाही. अलीकडे, इराने सोशल मीडियावर एक बाब शेअर केली आहे, जे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहे. इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्रीला डेट करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. ही तरुण अभिनेत्री आमिर खानची सहकलाकारदेखील राहिली आहे. संबंधित - कोरोनाने मरण्याआधी भुकेनेच मरू, पुण्यातील मजुरांचं हादरवून टाकणारं वास्तव इतर सेलेब्रिटींप्रमाणेच इरा खानही कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी घरीतच आहे. दरम्यान, सोशल मीडियावर काहीतरी मजेशीर करण्यासाठी तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या मित्रांना काही प्रश्न विचारण्याची संधी दिली आणि यावर सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचं तिनं आश्वासन दिलं. या प्रश्नांपैकी एक प्रश्न असा होता की, ’ तुम्ही सोशल डिस्टन्सिंगसाठी काय करीत आहात’. त्यावर लगेच उत्तर देताना इराने लिहिले ‘मी विचार करतेय की मी सान्या मल्होत्राला डेट करायला हवं’. इराने दिलेल्या या उत्तराला तिच्या इस्टाग्राम मित्रांनी खूप लाईक्स दिले आहेत.
याशिवाय तिने सान्या मल्होत्राला टॅग करत लिहिले की, ‘तुम्ही मला सर्वांच्या आधी निवडला हवं’. इराच्या या रंजक प्रस्तावावर सान्या काय उत्तर देते हे आता पाहावं लागणार आहे. या कमेंटसह इरा खानने हसणारा इमोजीही शेअर केला आहे. याचा अर्थ तो फक्त एक विनोद आहे. हे वाचा - VIDEO : लॉकडाऊनमध्ये मशिदीत जाणं पडलं महागात, नमाजनंतर पोलिसांनी अशी केली धुलाई इरा खान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही रंजक पोस्ट शेअर केले आहे. अलीकडेच तिचे बोल्ड फोटोशूट चर्चेत होते. इरा खान सध्या कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन झाल्याने इतरांप्रमाणे घरी आराम करत आहे. सान्या मल्होत्राबद्दल सांगायचं झालं तर ती लवकरच ‘लुडो’ चित्रपटात दिसणार आहे.