मुंबई, 26 मार्च : 'डीजेवाले बाबू', 'मर्सी', 'बझ' या गाण्यांसाठी प्रसिद्ध असणारा रॅपर बादशाहचे आणखी एक गाणं सोशल मीडियावर काही काळातच हिट ठरलं आहे. सध्या सर्वजण लॉकडाऊनमुळे घरातच आहेत. अशावेळी सोशल मीडिया हे एकमेव साधन आहे, ज्यामुळे लोकांचं मनोरंजन होत आहे. अशा परिस्थितीत बादशाहचं हे गाणं खूप लाइक्स आणि कमेंट्स मिळवत आहे. 'गेंदा फूल' (Genda Phool) या गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये हा जॅकलिन फर्नांडिस बादशाहसोबत थिरकताना दिसली आहे. ज्यामध्ये नेहमीप्रमाणेच जॅकलिन तिच्या हॉट अंदाजामध्ये दिसली आहे.
(हे वाचा-लॉकडाउन झाल्यानंतर परेश रावल यांनी शोधला Social Distancing चा अर्थ)
या गाण्यामध्ये फेस्टिव्ह आणि पारंपरिक अंदाज आहे. स्नेहा शेट्टीने (Sneha Shetty) दिग्दर्शित केलेला हा म्युझिक व्हिडीओ आजच प्रदर्शित झाला आहे.यामध्ये बंगाली दुर्गा पुजेचा समारोह वेगळ्या अंदाजाता साकारण्यात आला आहेे. यामध्ये जॅकलिन लाल आणि पांढऱ्या रंगाच्या साडी नेसून पारंपरिक बंगाली अंदाजात दिसत आहे.यातील बेंगाली ओळी गायिका पायल देवने गायल्या आहेत.
(हे वाचा-‘Lockdown मध्ये माझ्या डोक्यावर केस येतील’ अनुपम खेर यांची पोस्ट व्हायरल)
करण जोहरने ट्विटरवर या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यूट्युबवर आतापर्यंत 33 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
Here is is the new @Its_Badshah track to lift all your collective spirits!!! Dance to it! Sing to it! And omg how hot is @Asli_Jacqueline !!!! Such a cool song this is!!! https://t.co/F3iWvZfjOh ENJOY ❤️❤️❤️❤️❤️
— Karan Johar (@karanjohar) March 26, 2020
काही दिवसांपूर्वी जॅकलिन बिग बॉस फेम आसिम रियाझबरोबर 'मेरे अंगने मे' या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती. हा व्हिडीओ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.