Home /News /entertainment /

कंगनाने टीम इंडियातल्या 'या' क्रिकेटपटूला म्हटलं पंगेबाज

कंगनाने टीम इंडियातल्या 'या' क्रिकेटपटूला म्हटलं पंगेबाज

जिच्याशी पंगा घ्यायला सगळे घाबरतात अशा कंगनाला कोण पंगेबाज वाटतो याची उत्सुकता निश्चितच तिच्या चाहत्यांना आहे. तर कंगनाने नुकतचं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा संघातील सर्वात धाडसी खेळाडू वाटतो असं म्हटलं आहे.

  मुंबई,22 जानेवारी:  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत(Kangana Ranaut)सध्या तिच्या 'पंगा (Panga)'चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तिचा 'पंगा' हा चित्रपट 24 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. कंगनाचा बिनधास्त अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडतो. बरेली की बर्फी या चित्रपटाच्या दिगदर्शिका अश्विनी अय्यर तिवारी (Ashwiny Iyer Tiwari) यांनीच पंगा चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.'कंट्रोवर्सी क्वीन' ते 'पंगा क्वीन' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने पंगा किंग कोण आहे ते सांगितलं आहे. कंगनाला विराट कोहली वाटतो पंगा किंग जिच्याशी पंगा घ्यायला सगळे घाबरतात अशा कंगनाला कोण पंगेबाज वाटतो याची उत्सुकता निश्चितच तिच्या चाहत्यांना आहे. तर कंगनाने नुकतचं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा संघातील सर्वात धाडसी खेळाडू वाटतो असं म्हटलं आहे. तिने तिच्या पंगा चित्रपटाचं प्रमोशन करताना इंन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने म्हटलं की, विराट सही पंगे घेतो. तो अगदी माझ्यासारखा आहे, तोसुद्धा कोणालाच घाबरत नाही. आता आम्ही दोघेही सोबत पंगे घेणार आहोत. माझा पंगा थिएटरमध्ये असणार आहे तर विराट न्यूझीलंड सोबत त्याच्यांच भूमीवर पंगा घेणार आहे त्यामुळे मजा येईल असं ती म्हणते.
  पंगानंतर कंगनाचा थलाइवी हा चित्रपटही लवकरच होणार प्रदर्शित अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित पंगा या चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौतसह नीना गुप्ता, ऋचा चढ्ढा आणि जस्सी गिल यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा एका कबड्डी खेळाडूवर आहेत. खेळाडूच्या मुख्य भूमिकेत कंगना रणौत असून लग्नानंतर आई झाल्यानंतर या चित्रपटातील नायिका पुन्हा आपलं खेळातलं करिअर सुरू करण्याचा प्रयत्न करते. हाच प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. बॉलिवूडमध्ये 10 वर्षं काम करुनही श्रद्धा कपूर आली ‘रस्त्यावर’? पंगा सोबतच कंगना लवकरच तामिळ चित्रपटातही दिसणार आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत ती दिसणार आहे. हा चित्रपट जयललिता यांचा बायोपिक आहे. 26जून 2020 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पतीसोबत रोमान्स करताना भारती सिंहने बनवला tik tok व्हिडिओ, पण तितक्या...
  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: Bollywood news, Kangana ranaut, Panga movie

  पुढील बातम्या