कशी आहे शबाना आझमींची प्रकृती, कुटुंबीयांनी केला खुलासा

कशी आहे शबाना आझमींची प्रकृती, कुटुंबीयांनी केला खुलासा

शबाना आझमी यांच्या गाडीला 18 जानेवारीला जो अपघात झाला होता त्या अपघातात त्या जखमी झाल्या होत्या. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे.

  • Share this:

मुंबई,22 जानेवारी: बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी 18 जानेवारीला मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर झालेल्या अपघातात जखमी झाल्या होत्या. या अपघातात शबाना आझमींच्या डोक्याला दुखापत झाली होती. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनीही शबाना यांच्यावर योग्य उपचार होऊन त्या लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना केली होती. आता त्यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. शबाना यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आता काळजीचे कारण नाही असं कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं आहे.

कार चालकावर खटला दाखल

शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर जखमी अवस्थेत शबाना आणि कार चालक कमलेश कामत यांना मुंबईतील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि तिथून त्याच दिवशी त्यांना अंधेरीतील धीरूभाई अंबानी रूग्णालयात हलवण्यात आलं. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, शबाना यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र रूग्णालयातून त्यांना कधी सोडण्यात येईल याबाबत काही माहिती डॉक्टरांनी दिली नसल्याचं ते म्हणाले. शबाना यांचा कार चालक कमलेश कामत याच्यावर बेजबाबदारपणे कार चालवल्याबाबत खटला दाखल करण्यात आला आहे.

प्रकृतीबाबत चिंतेचं कारण नाही

शबाना आझमी यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांकडून जी माहिती देण्यात आली त्याआधी बोनी कपूर यांनी देखील माध्यमांना शबाना यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. मुंबई मिरर शी बोलताना ते म्हणाले की, डॉक्टरांशी शबाना यांच्या प्रकृतीबाबत बोलण झालं असून आता घाबरण्याचं काही कारण नाही. त्यांना जी दुखापत झाली आहे त्या दुखापतीच्या वेदनेमुळे त्या बेशुद्ध आहेत. बाकी चिंतेचं कारण नाही सर्व काही ठिक आहे.

'अनुपम खेर म्हणजे जोकर' नसीरुद्दीन यांच्या टीकेवर अनुपम यांनी VIDEO तून उत्तर

 

First published: January 22, 2020, 8:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading