'अनुपम खेर म्हणजे जोकर' CAA विरोधात बोलताना नसीरुद्दीन यांचा तोल सुटला; अनुपम यांनी VIDEO तून दिलं उत्तर

'अनुपम खेर म्हणजे जोकर' CAA विरोधात बोलताना नसीरुद्दीन यांचा तोल सुटला; अनुपम यांनी VIDEO तून दिलं उत्तर

'मी कुणालाही घाबरत नाही. पण मला या परिस्थितीचा राग येतोय', असं म्हणत नासीरुद्दीन यांनी मोदींवरही टीका केली. यावर उत्तर देण्यासाठी अनुपम खेर यांनी VIDEO ट्वीट केला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जानेवारी : ज्येष्ठ अभिनेते नसीरउद्दीन शाह यांनी CAA विरोधात भूमिका मांडणाऱ्या कलावंतांची बाजू उचलून धरली. या कायद्याच्या बाजूने मतं मांडणाऱ्या कलाकारांवर मात्र त्यांनी टीका केली. विशेषतः अनुपम खेर यांच्यावर थेट टीका करताना त्यांचा उल्लेख 'जोकर' असा केला. त्यावर अनुपम खेर यांनीही उत्तर देत Twitter वर एक VIDEO शेअर केला आहे.

'विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान मोदी असंवेदनशील आहेत, कदाचित ते विद्यार्थी दशेतून गेले नाहीत म्हणून असावं', असा टोला थेट मोदींना त्यांनी हाणला आणि 'मी कुणालाही घाबरत नाही. पण मला या परिस्थितीचा राग येतोय', असं ठणकावलं. 'अनुपम खेर जोकर आहेत. त्यांचं म्हणणं गांभीर्याने घेण्याची गरज नाही', असंही नसीरुद्दीन म्हणाले. यावर उत्तर देण्यासाठी अनुपम खेर यांनी एक VIDEO ट्वीट केला आहे.

"नासीरुद्दीन यांना पहिल्यापासून टीका करायची सवय आहे. तुम्ही आतापर्यंत अमिताभ, शाहरुख, राजेश खन्ना, विराट कोहली अशांवरही टीका केली आहे आणि यापैकी कोणी तुमचं म्हणणं गांभीर्याने घेतलं नाही. कारण तुम्ही बोलताय यात तुमचा दोष नाही. तुम्ही वर्षानुवर्षं ज्या पदार्थांचं सेवन करता त्यामुळे काय बरोबर काय चूक याचा तुमचा तुम्हालाच पत्ता लागत नाही."

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलनं सुरू होती त्या वेळी अनेक कलाकारांनी या निदर्शनांमध्ये भाग घेतला. दीपिका पदुकोणपासून तापसी पन्नू, आयुष्मान खुराना, फरहान अख्तर, रिचा चड्ढा आदी अभिनेते आंदोलनात सहभागी झाले. स्वरा भास्करने जाहीर भूमिकाही मांडली. आपण Twitter वर अॅक्टिव्ह नाही, त्यामुळे याविषयी तातडीने प्रतिक्रिया देऊ शकलो नाही, असं नासीरुद्दीन म्हणाले. The Wire ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं. "अनुपम सायकोपॅथ आहे. NSD मध्ये त्यांच्याबरोबर असणारेही हे सांगतील. ते त्यांच्या रक्तात आहे", अशी टीका नासीर यांनी केली.

'मी तुमची टीका अजिबात गांभीर्याने घेणार नाही. जनाब नासीरजी, माझ्या रक्तात हिंदुस्थान आहे, हे फक्त समजून घ्या', असा टोलाही अनुपम यांनी हाणला.

First published: January 22, 2020, 7:53 PM IST

ताज्या बातम्या