मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तेजस्वी प्रकाशच्या मराठी सिनेमाचं गाणं रिलीज; दणकून नाचली अभिनेत्री, Video व्हायरल

तेजस्वी प्रकाशच्या मराठी सिनेमाचं गाणं रिलीज; दणकून नाचली अभिनेत्री, Video व्हायरल

तेजस्वी प्रकाश

तेजस्वी प्रकाश

बिग बॉस हिंदीची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमाच्या प्रमोशनवेळी अभिनेत्री दणकून नाचताना दिसली. अभिनेता अभिनय बेर्डेबरोबर तेजस्वी स्क्रिन शेअर करणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 07 ऑक्टोबर : बिग बॉस हिंदी फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. हिंदी बिग बॉसमध्ये राडा घालून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या तेजस्वीनं आता मराठीमध्ये एंट्री घेतली आहे. "मन कस्तुरी रे" हा तेजस्वीचा नवा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 4 नोव्हेंबरला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याआधी सिनेमाचं दणकून प्रमोशन सुरू आहे. नुकतंच सिनेमात एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं. तरुणाईला आवडेल अशा या सिनेमातील गाण्याचं प्रमोशन देखील पल्लाई कॉलेजच्या ऑडिटोरिअममध्ये करण्यात आलं. यावेळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश दणकून नाचताना दिसली.

मन कस्तुरी रे या सिनेमाचा फर्स्ट लुक समोर आल्यानंतरच तेजस्वीचा मराठीतील डेब्यू पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी उत्सुकता दाखवली होती. मराठमोळा अभिनेता अभिनय बेर्डे या सिनेमात तेजस्वीबरोबर प्रमुख  भूमिकेत आहे.  "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं पण सगळ्यांचं सेम नसतं", अशी टॅग लाइन घेऊन हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमातील नाद हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं.

हेही वाचा - हिंदी बिग बॉस विजेती आता मराठी पडदा गाजवणार, अभिनय बेर्डेसोबत रोमान्स करताना दिसणार

गाण्याच्या लाँचिंगवेळी तेजस्वीचा कलरफुल अंदाज पाहायला मिळाला. रिप्ड जिन्स आणि मल्टिकलर टॉपमध्ये तेजस्वीचा हटके अंदाज पाहायला मिळाला. इव्हेंटच्या ठिकाणी पोहोचताच सिनेमातील कलाकारांचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. तेजस्वीनं देखील ढोल वाजवण्याचा प्रयत्न केला. अभिनय आणि तेजस्वी दोघांनी ढोलाच्या गजरात दणकून नाच केला.

इव्हेंटमध्ये गाण्याच्या लाँचिंगवेळी तेजस्वीनं गिटार हातात घेत स्टेजवर परफॉर्मन्स केला. गाण्यातून तेजस्वीचा रॉकस्टार अंदाज पाहायला मिळाला.  यावेळी तेजस्वीचं ब्लॅक अँड व्हाइट स्केच देखील तिला गिफ्ट करण्यात आलं. सिनेमात तेजस्वी श्रृती नावाच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. जी फारच शांत स्वभावाची आहे. पण तरीही तिला सगळे डॉन म्हणून ओळखतात. तर स्टार किड असलेला अभिनय बेर्डेबरोबर तेजस्वीची जोडी एकदम हटके दिसत आहे.

ही फ्रेश जोडी प्रेक्षकांवर काय जादू करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Marathi news