मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Man Kasturi Re: अभिनय बेर्डेसोबत रोमान्स करणार तेजस्वी प्रकाश; 'या'दिवशी रिलीज होणार अभिनेत्रीचा मराठी सिनेमा

Man Kasturi Re: अभिनय बेर्डेसोबत रोमान्स करणार तेजस्वी प्रकाश; 'या'दिवशी रिलीज होणार अभिनेत्रीचा मराठी सिनेमा

सध्या अनेक हिंदी कलाकार मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उमठविण्यासाठी सज्ज आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रकाश होय.

सध्या अनेक हिंदी कलाकार मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उमठविण्यासाठी सज्ज आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रकाश होय.

सध्या अनेक हिंदी कलाकार मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उमठविण्यासाठी सज्ज आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रकाश होय.

    मुंबई, 8 ऑगस्ट-   सध्या अनेक हिंदी कलाकार मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उमठविण्यासाठी सज्ज आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रकाश होय. 'बिग बॉस 15'ची विजेती आणि एकता कपूरच्या 'नागिन' फेम तेजस्वी प्रकाश लवकरच अभिनय बेर्डेसोबत मराठी चित्रपटात झळकणार आहे. याबाबत आधीच आम्ही तुम्हाला कल्पना दिली होती. परंतु आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. तेजस्वी प्रकाशने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. परंतु 'बिग बॉस'ने तिला एक खास ओळख निर्माण करुन दिली आहे. या शोमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. तसेच अभिनेत्री करण कुंद्रासोबतच्या आपल्या नात्यामुळेसुद्धा प्रचंड चर्चेत असते. तेजस्वी जरी हिंदी पडदा गाजवत असली तरी ती एक मराठी मुलगी आहे. तिचं मराठीवरील प्रेम वारंवार दिसून आलं आहे. त्यांनतर आता अभिनेत्री मराठीत दमदार पदार्पण करत आहे. याबाबत तिने यापूर्वीही पोस्टर शेअर करत माहिती दिली होती. परंतु चाहत्यांना या चित्रपटाच्या रिलीजची प्रचंड उत्सुकता होती. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. तेजस्वी प्रकाश मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डेचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत झळकणार आहे. अभिनय हा एक प्रसिद्ध स्टारकीड असूनसुद्धा त्याने आपली स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. अभिनयने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर करत, या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (हे वाचा:'ये है मोहब्बतें' फेम अभिनेत्री पडली सरकारी अधिकाऱ्याच्या प्रेमात; लवकरच बांधणार लग्नगाठ ) तेजस्वी प्रकाशने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन्स या विषयांमध्ये अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली आहे. त्यानंतर ती अभिनयाकडे वळली होती. तेजस्वी प्रकाशने वयाच्या 18 व्या वर्षी करिअरची सुरूवात केली होती. तेजस्वीने 2012 मध्ये टीव्ही शो '2612' पासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरूवात केली होती. या अभिनेत्रीने संस्कार धरोहर अपनों की, स्वरागिनी , पहरेदार पिया की व 'सिलसिला बदलते रिश्तों का या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती 'नागिन' मध्ये झळकत आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bigg boss, Entertainment, Marathi cinema, Marathi entertainment

    पुढील बातम्या