मुंबई, 13 सप्टेंबर : तेजस्वी प्रकाश ही अभिनेत्री सध्या जिकडेतिकडे गाजत आहे. ‘बिग बॉस 15’ ची विजेती झाल्यांनंतर ती कायम चर्चेत राहिली आहे. तिच्या मालिका आणि करण कुंद्राच्या रिलेशनशिपमुळे हि अभिनेत्री सगळ्यांना परिचित आहे. आता मराठमोळी तेजस्वी मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उमठविण्यासाठी सज्ज झाली आहे.. तेजस्वी प्रकाश लवकरच अभिनय बेर्डेसोबत ‘मन कस्तुरी रे’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे. याबाबत आधीच आम्ही तुम्हाला कल्पना दिली होती. परंतु आता या चित्रपटातील तिचा पहिला लूक समोर आला आहे. तेजस्वी प्रकाशच्या या चित्रपटात एका रॉकस्टारच्या भूमिकेत पाहायला मिळेल असं दिसतंय. समोर आलेल्या या फर्स्ट लुक मध्ये तेजस्वी खूपच लाघवी दिसत आहे. या चित्रपटात ती ‘श्रुती’ या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही श्रुती एका बाजूला शांत स्वभावाची मुलगी आहे तर त्याचबरोबर ती एक रॉकस्टार असल्याचं दिसतंय. हा टिझर पाहून आता चाहत्यांच्या मनात या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यांच्या या प्रश्नांची उत्तरं येत्या ४ सप्टेंबरला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मिळतील.
या टीझरला अल्पावधीतच चाहत्यांचा खूपच प्रतिसाद मिळत आहे. तेजस्वीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा टिझर रिलीज केला आहे. या पोस्टला तिने मस्त कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलंय कि, ‘‘‘ती…पहाटे पडलेलं गोड स्वप्न…ती…सांजवेळी बहरलेल्या मोगऱ्याचा सुगंध…तिच्या सोबतीचे क्षण हवेहवेसे…तिला पाहता मन कस्तुरी रे!…मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय एक गोड हसरा चेहरा … ‘श्रुती’ च्या भूमिकेत.. तेजस्वी प्रकाश’’ हेही वाचा - Indra-Deepu: पुन्हा दिसणार इंद्रा-दीपूची केमिस्ट्री; हृता-अजिंक्य लवकरच चित्रपटात झळकणार एकत्र तेजस्वी प्रकाशचा हा लुक चाहत्यांना खूपच आवडला आहे. त्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच तिचा या चित्रपटातील फर्स्ट लुक पाहून आता तिला श्रुतीच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. तेजस्वी प्रकाश मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डेचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत झळकणार आहे. अभिनय हा एक प्रसिद्ध स्टारकीड असूनसुद्धा त्याने आपली स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. मराठी सिनेसृष्टीत आता हि नवीकोरी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या चित्रपटासोबतच सध्या तेजस्वी प्रकाश ‘नागिन ६’ मालिकेत दिसत आहे. त्याचबरोबर ती अभिनेता आयुषमान खुरानासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटात तेजस्वी आयुष्मानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.