जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Indra-Deepu: पुन्हा दिसणार इंद्रा-दीपूची केमिस्ट्री; हृता-अजिंक्य लवकरच चित्रपटात झळकणार एकत्र

Indra-Deepu: पुन्हा दिसणार इंद्रा-दीपूची केमिस्ट्री; हृता-अजिंक्य लवकरच चित्रपटात झळकणार एकत्र

Indra-Deepu: पुन्हा दिसणार इंद्रा-दीपूची केमिस्ट्री; हृता-अजिंक्य लवकरच चित्रपटात झळकणार एकत्र

इंद्रा आणि दीपूच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. परंतु काही दिवसांपूर्वी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. त्यामुळे चाहते प्रचंड निराश झाले होते.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 सप्टेंबर-  महाराष्ट्राची क्रश म्हणून अभिनेत्री हृता दुर्गुळेला ओळखलं जातं. हृताने आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर मोठं यश संपादन केलं आहे. अभिनेत्री काही दिवसांपूर्वी ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत झळकली होती. ही मालिका अतिशय लोकप्रय ठरली होती. यामध्ये हृताने अभिनेता अजिंक्य राऊतसोबत काम केलं होतं. मालिकेतील इंद्रा आणि दीपूच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. परंतु काही दिवसांपूर्वी मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. त्यामुळे चाहते प्रचंड निराश झाले होते. परंतु आता इंद्रदीपच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. झी मराठीवर ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका काही महिन्यांपूर्वी भेटीला आली होती. या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळेनं दीपूची तर अभिनेता अजिंक्य राऊतनं इंद्राची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे इंद्रा आणि दीपूची प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. शांत-सालस-सुशिक्षित दीपू तर दुसरीकडे डॅशिंग-कमी शिकलेला पण तितकाच हळवा इंद्रा अशी ही जोडी होती. या जोडीने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. त्यामुळेच मालिका बंद न करण्याची मागणी केली जात होती. शिवाय या जोडीला पुन्हा नव्या प्रोजेक्टमध्ये पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती. आता चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. इंद्रा आणि दीपूची म्हणजेच अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊतची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे हे दोघे आता मालिकेत नव्हे तर एका चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. लवकरच या दोघांचा ‘कन्नी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही माहिती समोर येताच या दोघांचे चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी सर्वच आतुर आहेत. परंतु यावेळी त्यांची भूमिका कशी असणार लुक कोणता असणार ययाबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाहीय.

जाहिरात

(हे वाचा: Hruta Durgule : हृताच्या वाढदिवशी पतीची रोमॅन्टीक पोस्ट; म्हणाला, ‘तू माझ्या आणखी….’ **)** कामाबाबत सांगायचं तर हृता नुकतंच टाईमपास 3 आणि अनन्या या चित्रपटांमध्ये झळकली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली आहे. सध्या हृता आपल्या पतीसोबत विदेशात आपल्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेली आहे. तर अजिंक्य राऊत लवकरच ‘टकाटक 2’ या मराठीतील पहिल्या अतिशय बोल्ड चित्रपटात झळकणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात