मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मालिकांमधील वादावर भडकली तेजश्री प्रधान, म्हणाली ‘मी ब्राह्मण नाही पण मला...’

मालिकांमधील वादावर भडकली तेजश्री प्रधान, म्हणाली ‘मी ब्राह्मण नाही पण मला...’

सध्या मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. इतर मराठी मुली का नाही? असा प्रश्न सुजय डहाकेनं केला होता. ज्यामुळे नवा वादाला तोंड फुटलं आहे.

सध्या मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. इतर मराठी मुली का नाही? असा प्रश्न सुजय डहाकेनं केला होता. ज्यामुळे नवा वादाला तोंड फुटलं आहे.

सध्या मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. इतर मराठी मुली का नाही? असा प्रश्न सुजय डहाकेनं केला होता. ज्यामुळे नवा वादाला तोंड फुटलं आहे.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 05 मार्च : 'शाळा' आणि 'फुंत्रू' या सिनेमांचा दिग्दर्शक सुजय डहाकेचा 'केसरी' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. मात्र हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर एक नवा वादही मराठी सिनेसृष्टीत सुरू झाला आहे. या सिनेमाच्या रिलीजच्या आधी दिलेल्या एका मुलाखातीत त्यानं सध्या मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही? असा प्रश्न केला होता. ज्यामुळे नवा वादाला तोंड फुटलं आहे.

‘केसरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजय डहाके यांनं लोकसत्ता ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत मराठी मालिकांमध्ये सर्व ब्राह्मण मुलीच दिसतात इतर मराठी मुली का नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्या वक्तव्यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तेजश्री प्रधान हिनेही सोशल मीडियावर एक पोस्ट करत सुजयचं नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला आहे. मी ब्राह्मण नाहीये तरी माझ्याकडे काम आहे. असं तेजश्रीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मराठी सिनेकलाकारांचं पीएम मोदींच्या पावलावर पाऊल, corona virus मुळे होळी रद्द

तेजश्री प्रधान हिनं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं लिहिलं, ‘मी ब्राह्मण नाहीये बरं! सीकेपी आहे. पण गेली अनेक वर्ष माझ्याकडे काम आहे. याला टॅलेंट म्हणूया का?’ तेजश्रीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियवर खूप व्हायरल झाली आहे.

स्वतःहून 10 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता अभिनेता

तेजश्री प्रधान व्यतिरिक्त अभिनेता शशांक केतकरनंही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. एक तरुण दिग्दर्शकानं असं काही बोलावं अशी अपेक्षा अजिबात नव्हती. त्यानं त्याच्या कामावर लक्ष द्यावं आणि त्यानं आतापर्यंत जसं चांगलं काम आमच्यासमोरं आणलं आहे तसं पुढेही यावं हीच त्याच्याकडून अपेक्षा आहे. पण अशाप्रकारे वक्तव्य करुन त्याला काय म्हणायचं आहे हे मला समजत नाही अशी प्रतिक्रिया शशांकनं न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली.

यंदा कर्तव्य आहे! 4 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर बॉलिवूड अभिनेता अडकणार विवाहबंधनात

‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका...’ मालिका वादात शशांक केतकरची उडी

First published:

Tags: Tejashree Pradhan