मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

स्वतःहून 10 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला अभिनेता, आता असं आहे मॅरिड लाइफ

स्वतःहून 10 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला अभिनेता, आता असं आहे मॅरिड लाइफ

या अभिनेत्याच्या दुसऱ्या लग्नामुळे त्याच्या पर्सनल लाइफची चर्चा सर्वाधिक झाली. त्याची दुसरी पत्नी गौरी ही त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे.

या अभिनेत्याच्या दुसऱ्या लग्नामुळे त्याच्या पर्सनल लाइफची चर्चा सर्वाधिक झाली. त्याची दुसरी पत्नी गौरी ही त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे.

या अभिनेत्याच्या दुसऱ्या लग्नामुळे त्याच्या पर्सनल लाइफची चर्चा सर्वाधिक झाली. त्याची दुसरी पत्नी गौरी ही त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 05 मार्च : टीव्ही वरील सर्वात लोकप्रिय अभिनेता हितेन तेजवानी आज 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'कसौटी जिंदगी की', 'कुसुम' आणि 'पवित्र रिश्ता' सारख्या टीव्ही मालिकांमधून लोकांच्या घराघरात पोहोचलेला हितेन त्याच्या कामापेक्षा जास्त त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत राहिला आहे. खासकरून त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे त्याच्या पर्सनल लाइफची चर्चा सर्वाधिक झाली. कारण त्याची दुसरी पत्नी गौरी ही त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या मॅरिड लाइफबद्दल काही खास गोष्टी...

वर्षभरात तुटलं होतं पहिलं लग्न

हितेन तेजवानी याचं खासगी आयुष्य त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा जास्त चर्चेत राहिलं आहे. घरातल्याच्या दबावाखाली येऊन हितेननं लग्न केलं मात्र त्याचं पहिलं लग्न वर्षभरात तुटलं. 2001 मध्ये त्यानं त्याची पहिल्या पत्नीला पसस्पर संमतीनं घटस्फोट दिला. या घटस्फोटासाठी तो स्वतः जबाबदार असल्याचंही त्यानं म्हटलं होतं.

मलायकानं शेअर केली नवी YOGA पोस्ट, एकदा करून पाहा; असा होईल फायदा

या ठिकाणी झाली होती गौरी-हितेनची पहिली भेट

हितेनची दुसरी पत्नी गौरी हिच्याशी त्याची पहिली भेट मुंबई एअरपोर्टवर झाली होती. 1999 मध्ये ते दोघं एका जाहीरातीच्या शूटिंगसाठी बंगळुरूला जात होते. पण हे दोघंही एकाच जाहीरातीच्या शूटिंगसाठी जात आहेत हे दोघांनाही माहित नव्हतं.

6 महिन्यानंतर पुन्हा झाली भेट

या जाहीरातीच्या शूटिंगनंतर 6 महिन्यांनी हे दोघं एकता कपूरच्या कुटुंब मालिकेच्या सेटवर पुन्हा भेटले. पण त्यांचं बोलणं हाय-हॅलो पर्यंत मर्यादित होतं कारण गौरीचा स्वभाव फारसा बोलका नव्हता. ब्रेकमध्ये ती अनेकदा पुस्तकं वाचत राहायची.

सलमान खानचं आणखी एका बॉलीवूड अभिनेत्यासोबत वाजलं, पुन्हा कारण ठरली कतरिना

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली जोडी

कुटुंब मालिकेतील या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या दोघांची लोकप्रियता एवढी वाढली की, एकता कपूरनं या दोघांना तिच्या नव्या मालिकेसाठी पुन्हा एकदा कास्ट केलं. यात ‘घर एक मंदिर’ आणि ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकांचा समावेश होता.

असे पडले प्रेमात

बऱ्याच मालिकांमध्ये एकत्र काम केल्यानंतर हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास 2 वर्षांपर्यंत दोघं एकमेकांना डेट करत होते आणि मग 2004 मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हितेन आणि गौरी आता त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप खूश आहे. या दोघांना जुळी मुलं सुद्धा आहेत. मुलाचं नाव नेवान तर मुलीचं नाव कात्या असं आहे.

PHOTOs मुलीच्या पूलसाइड बर्थडे पार्टीत 76 व्या वर्षी तनुजाने घातला स्विमसूट

First published:

Tags: Tv actor