यंदा कर्तव्य आहे! 4 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर बॉलिवूड अभिनेता अडकणार विवाहबंधनात

यंदा कर्तव्य आहे! 4 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर बॉलिवूड अभिनेता अडकणार विवाहबंधनात

बॉलिवूडचा एक डॅशिंग अभिनेता लवकरच लग्नाच्या बेडीत अडणार आहे. मागच्या 4 वर्षांपासून हा अभिनेता एका मॉडेलला डेट करत आहे

  • Share this:

मुंबई, 05 मार्च : बॉलिवूडमध्ये सध्या सेलिब्रेटी वेडिंगच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. मागच्या काही काळापासून बहुचर्चित कपल आलिया भट आणि रणबीर कपूर लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचा चर्चा आहेत. याशिवाय अली फजल आणि रिचा चड्ढा सुद्धा एप्रिल महिन्याच्या मध्यात लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच बॉलिवूडचा आणखी एक डॅशिंग अभिनेता लवकरच लग्नाच्या बेडीत अडणार आहे. मागच्या 4 वर्षांपासून हा अभिनेता एका मॉडेलला डेट करत आहे आणि आता तिच्याशीच तो लग्नगाठ बांधणार आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डा काही दिवसांपूर्वी लव्ह आज कल या सिनेमात दिसला होता. या सिनेमातील त्याच्या छोट्याशा भूमिकेनंही प्रेक्षकांची मनं जिंकली. आता रणदीप लवकरच त्याच्या चाहत्यांच्या आनंदाची बातमी देणार आहे. एवढी प्रसिद्ध मिळावल्यानंतर रणदीपच्या पर्सनल लाइफ बद्दल कोणालाच फारशी माहिती नाही कारण तो त्याच्या पर्सनल लाइफबद्दल बोलणं नेहमीच टाळताना दिसतो. रणदीप मागच्या 4 वर्षांपासून मणिपुरी मॉडेलसोबत लिन लॅशराम हिच्याशी रिलेशनशिपमध्ये आहे आणि लवकरच हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

सलमान खानचं आणखी एका बॉलीवूड अभिनेत्यासोबत वाजलं, पुन्हा कारण ठरली कतरिना

2018 मध्ये पहिल्यांदा रणदीप आणि त्याची गर्लफ्रेंड लिन यांना नवी दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये पाहिलं गेलं. लिननं बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. 2014 मध्ये रिलीज झालेल्या प्रियांका चोप्राच्या मेरी कॉममध्ये तिनं बेम-बेमची भूमिका साकारली होती. याशिवाय तिनं नसीरुद्दीन शाह यांच्या थिएटर ग्रुपमध्येही काम केलं आहे.

PHOTOs मुलीच्या पूलसाइड बर्थडे पार्टीत 76 व्या वर्षी तनुजाने घातला स्विमसूट

स्पॉटबॉय-ईनं दिलेल्या वृत्तानुसार रणदीप लवकरच त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख आई-वडीलांशी करुन देणार आहे. रणदीपनं याआधी बहीण अंजली हुड्डाशी लिनची ओळख करुन दिली आहे. आता तो आई-वडीलाशी ओळख करुन देण्याच्या तयारीत आहे. यावरुन तो यंदाच्या वर्षात लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

ऑस्कर विजेत्या अभिनेत्याच्या मृत्युपत्रातने खळबळ, स्टार मुलाला फुटकी कवडीही नाही

रणदीपच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो काही दिवसांपूर्वी लव्ह आज कलमध्ये दिसला होता. त्याच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं. यावर्षी तो सलमान खानच्या राधे सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सलमान खानसोबत दिशा पाटनी सुद्धा मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा 22 मे 2020 ला रिलीज होत आहे.

First published: March 5, 2020, 9:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading