मुंबई, 05 मार्च : सध्या जगभरात कोरोना व्हायरसनं (corona virus) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अशात सध्या भारतात मात्र होळाच्या सणाची लगबग सुरु आहे. पण कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा होळी खेळणार नसल्याचं ट्विटवरुन सांगितलं होतं. त्यानंतर आता मराठी सिने कलाकारांचं दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारं होळीचं सेलिब्रेशन यंदा रद्द करण्यात आलं आहे. सध्या देशात कोरोना व्हायरसची लागण झालेले 28 रुग्ण आढळल्यानं सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. या व्हायरस हवेतून किंवा लगण झालेल्या माणसांच्या संपर्कातून पसरत असल्यानं यंदा एकत्र येऊन होळी खेळण्याचे कार्यक्रम सर्व ठिकाणी रद्द करण्यात आले आहेत. यात आता मराठी सिने कलाकारांचीही भर पडली आहे. त्यामुळे मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये धामधुमीत खेळला जाणारा रंगांचा उत्सव यंदा खेळला जाणार नाही. यंदा कर्तव्य आहे! 4 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर बॉलिवूड अभिनेता अडकणार विवाहबंधनात
Experts across the world have advised to reduce mass gatherings to avoid the spread of COVID-19 Novel Coronavirus. Hence, this year I have decided not to participate in any Holi Milan programme.
— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2020
कोरोना व्हायरस (Coronavirus) अर्थात COVID-19 च्या संक्रमणामुळे जगभरात 3 हजार 131 माणसांचा मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचा धोका वाढला आहे. अशावेळी वैयक्तिक पातळीवर काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीमधील होळी आणि रंग खेळण्याचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मराठी मालिकांच्या कलाकारांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही मात्र मराठी सिने कलाकारांची यंदा एकत्र येत होळी खेळणं टाळलं आहे. महाभयंकर कोरोनाची देशभरात भीती, संक्रमणापासून वाचण्यासाठी करा हे उपाय Alert! मुंबईतील कोरोना व्हायरसची ‘ही’ बातमी आहे अफवा

)







