Oscar च्या रेड कार्पेटवर सॅन्डविच घेऊन पोहोचली अभिनेत्री, कारण वाचून व्हाल हैराण

Oscar च्या रेड कार्पेटवर सॅन्डविच घेऊन पोहोचली अभिनेत्री, कारण वाचून व्हाल हैराण

Oscar अवॉर्ड सोहळ्याला येताना पर्समधून सॅन्डविच घेऊन आल्यानं सध्या ज्यूलिया सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

  • Share this:

लॉस एंजेलिस, 11 फेब्रुवारी : हॉलिमधील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराची सर्वच सेलिब्रेटी आतुरतेनं वाट पाहत असतात. यंदाचा ऑस्कर सोहळा नुकताच पार पडला आणि यावेळी नेहमी प्रमाणे रेड कार्पेटवर कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. पण यातही सर्वाधिक चर्चेत राहिली ती वन्स अपॉन टाइम इन हॉलिवूडची 11 वर्षीय अभिनेत्री ज्यूलिया बटर्स. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं सर्वांनीच खूप कौतुक केलं. पण यासोबतच या अवॉर्ड सोहळ्याला येताना पर्समधून सॅन्डविच घेऊन आल्यानं सध्या ज्यूलिया सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

ऑस्कर अवॉर्ड सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्वच गेस्ट आणि कलाकारांना पिझ्झा आणि पॉपकॉर्न अशाप्रकारेचा स्नॅक्स दिला जातो. पण हॉलिवूडमधील सर्वच मोठ्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या ज्यूलियानं मात्र स्वतःसाठी एक सॅन्डविच पर्समधून घेऊन आली होती. ज्यावेळी तिला तिच्या पर्समध्ये काय आहे असं विचारण्यात आलं तेव्हा तिनं तिची पर्स उघडून सॅन्डविच दाखवलं आणि असं करण्याचं कारणही तिनं सांगितलं.

जॉन सीनालाही लागलंय Bigg Boss चं याड! असिम रियाजचा फोटो शेअर करुन म्हणाला...

ज्यूलिया सध्या तिनं पर्समधून आणलेल्या सॅन्डविचमुळे खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर सगळीकडे तिच्याच नावाची चर्चा आहे. या सॅन्डविच बद्दल बोलताना ज्यूलिया म्हणाली, हे एक टर्की सॅन्डविच आहे आणि याबद्दल मी वेगन लोकांची माफी मागते. मी हे सॅन्डविच माझ्या पर्समध्ये यासाठी आणलं आहे कारण इथे पिझ्झा किंवा पॉपकॉर्न काहीही दिसत नाही आहे. किंवा ते असेलच तर त्याची टेस्ट मला आवडेल याची खात्री नाही.

‘फी वाढवण्यासाठी सलमान देतो शो सोडण्याची धमकी’, भाईजानवर कोणी केला गंभीर आरोप

सोशल मीडियावर ज्यूलियाच्या या सॅन्डविचची चर्चा सुरू आहे. एका ट्विटर युजरनं लिहिलं, ऑस्करमध्ये ज्यूलिया बटर्सनं आपल्या पर्समधून सॅन्डविच आणलं. तिच्या या कृतीनं मला पहिल्यांदाच एखादी व्यक्ती माझ्या जवळीची वाटली. दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘ज्यूलियाच्या या कृतीनं ती आत्ताच लिजेंड ठरली आहे.’ ज्यूलियानं काम केलेल्या वन्स अपॉन टाइम इन हॉलिवूडला 10 कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळालं होतं. यातून या सिनेमाला 2 ऑस्कर पुरस्कार मिळाले.

नेहा-आदित्यच्या लग्नात मोठा ट्वीस्ट, उदित नारायण यांच्या खुलाशानं फॅन्सना धक्का

First published: February 11, 2020, 1:04 PM IST

ताज्या बातम्या