Home /News /entertainment /

'तारक मेहता फेम' नट्टू काका काळाच्या पडद्याआड, रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

'तारक मेहता फेम' नट्टू काका काळाच्या पडद्याआड, रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

घनश्याम यांच्या घशात गाठ तयार झाली होती. अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलं होतं.

    मुंबई, 03 ऑक्टोबर : प्रसिद्ध टीव्ही मालिका तारक मेहतामधील (Tarak Mehta Ka Oooltah Chashmah) नट्टू काका Nattu Kaka)  फेम अभिनेते घनश्याम नायक (Ghanshyam Nayak) यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. अखेर उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. (actor Ghanshyam Nayak passes away ) गेल्या काही दिवसांपासून घनश्याम तारक मेहता सिरीयलमध्ये दिसत नव्हते. लॉकडाऊननंतर शूट झालेल्या एपिसोडमध्ये नट्टू काका दिसले नसल्यानं चाहत्यांनाही प्रश्न पडला होता. सोशल मीडियावरही होणाऱ्या उलट-सुलट चर्चांनंतर घनश्याम यांची प्रकृती ठीक नसल्याचे समोर आले होते. Part Time Jobs: काही तासांचं काम आणि मिळतील भरघोस पैसे; हे पार्ट टाइम जॉब्स कराच घनश्याम यांना मागील वर्षी कॅन्सर असल्याचं समजलं होतं. त्यांच्यावर किमोथेरपी केली जात होती याबद्दल त्यांच्या मुलगा विकास याने माहिती दिली होती.' मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांचं गळ्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं. ज्यातून त्यांच्या 8 गाठी काढण्यात आल्या होत्या.” Bigg Boss Marathi 3' च्या चावडीनंतर आदर्श शिंदेची भावाच्या समर्थानार्थ पोस्ट.. घनश्याम यांच्या घशात गाठ तयार झाली होती. त्यामुळे त्यांना खूप जास्त त्रास होऊ लागला होता. अचानक प्रकृती बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलं होतं. नट्टू काका लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा तारक मेहतामध्ये परतावेत यासाठी चाहत्यांसह सिरीयलमधील टीमही प्रार्थना करत होती. मात्र, गेल्या महिन्याच्या उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाली नाही. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. घनश्याम नायक गेल्या 10 वर्षांपासून तारक मेहतामध्ये नट्टू काकांची भूमिका निभावत होते.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या