Home /News /career /

Part Time Jobs: अवघ्या काही तासांचं काम आणि मिळतील भरघोस पैसे; 'हे' पार्ट टाइम जॉब्स करून बघाच

Part Time Jobs: अवघ्या काही तासांचं काम आणि मिळतील भरघोस पैसे; 'हे' पार्ट टाइम जॉब्स करून बघाच

कोणत्या पार्ट टाइम जॉब्समध्ये अधिक पैसे (Best salary part time jobs) मिळू शकतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

    मुंबई, 03 ऑक्टोबर: गेल्या दीड वर्षांमध्ये कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर ज्यांची नोकरी आहे अशा बहुतांश कमी पगारात काम करावं लागत आहे. त्यातच कोरोनानंतर पैसे कमावण्याच्या दुसऱ्या काही साधनांनाही (Second source of Income) लोक प्राधान्य देत आहेत. यापैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे पार्ट टाइम जॉब्स (Part Time Jobs in India). आजकालच्या पार्ट टाइम जॉब्स (Latest Part time jobs) करून अनेकजण भरघोस पैसे कमवत आहेत. मात्र पार्ट टाइम जॉब्स (Best part time jobs for money) करावे तरी कोणते? कोणत्या पार्ट टाइम जॉब्समध्ये अधिक पैसे (Best salary part time jobs) मिळू शकतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. कन्टेन्ट रायटिंग (Content writing) आजकालच्या काळात कन्टेन्ट रायटिंगला (Content writing jobs) प्रचंड महत्त्वं प्राप्त झालं आहे. कोणत्याही विषयांवर परखडपणे आणि स्पष्ट लिहिण्याची कला तुमच्यात असेल तर तुम्ही कन्टेन्ट रायटिंगचा पार्ट टाइम जॉब करू शकता. तसंच विविध विषयांवर ज्ञान प्राप्त करून लिहिण्याची सवय असेल तर हा जॉब तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतो. यासाठी तुम्हाला तुमचा संपूर्ण दिवस घालवण्याची गरज नाही. अवघ्या काही तासांमध्ये तुम्ही काम पूर्ण करू शकता. यामुळे तुम्हाला भरघोस पैसे मिळू शकतात. हे वाचा - आठवडाभर ऑफिसचं काम करून कंटाळा आलाय? मग सुटीच्या दिवशी करा 'हे' भन्नाट कोर्सेस योगा क्लासेस (Yoga Classes) जर तुम्हाला योगा करायला आवडत असेल आणि त्यात तुम्ही शिक्षण घेतलं असेल तर यापेक्षा मोठा चांगला जॉब तुम्हाला मिळणार नाही. संपूर्ण जगभरात योगसाधनेला किती महत्त्वं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. त्यात देशात ठिकठिकाणी योगाचे क्लासेस चालतात. त्यामुळे तुम्हीही तुमच्या घरात किंवा एखाद्या ठिकणी हे क्लासेस सुरु करू शकता. यामुळे तुम्हाला भरघोस पैसे मिळू शकतात. ऑनलाईन डेटा एंट्री (Online Data Entry) अनेक कंपन्यांमध्ये डेटा एंट्रीसाठी कर्मचाऱ्यांची गरज असते. मात्र यासाठी ते पूर्णवेळ कर्मचारी ठेऊ इच्छित नसतात. अशा परिस्थिती तुम्ही त्या कंपन्यांसाठी पार्ट टाइम डेटा एंट्री करू शकता. या कामाचा ती कंपनी तुम्हाला योग्य तो मोबदला देऊ शकते. आजकालच्या काळात डेटा एंट्री करून भरपूर पैसे कमवता येऊ शकतात. हे वाचा - Microsoft Recruitment: फ्रेशर्ससाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरीची मोठी सुवर्णसंधी सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing) साधायचा जगात अतिशय ट्रेंडिंग असलेला हा जॉब आहे. एखादी कंपनी किंवा स्टार्टअप यांच्या सोशल मीडिया अकाउंटला हजारो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करू शकता. तसंच त्या कंपनीच्या प्रोडक्ट्सचं मार्केटिंग करू शकता. यामुळे तुम्हाला भरपूर पगार मिळू शकतो. विशेष म्हणजे या कामांसाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही हे काम तुम्ही घरूनच पार्ट टाइम करू शकता.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Jobs

    पुढील बातम्या