सोहा अली खानच्या मुलीने काय केलं पाहा, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'How Sweet'

सोहा अली खानच्या मुलीने काय केलं पाहा, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'How Sweet'

कुणाल खेमू आणि सोहा अली खानची मुलगी इनाया खानचा आणखी एक व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी तैमुरप्रमाणेच Cute असणाऱ्या त्याच्या बहिणीचा अर्थात इनायाचा Cute आवाजात गायत्रीमंत्र म्हणताना व्हिडीओ व्हायरल झाला होता.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी :  सोशल मीडियावर स्टार किड्सचा नेहमीच बोलबोला असतो. यामध्ये ‘पतौडी किड्स’ खूप जास्त प्रसिद्ध आहेत. तैमुर असो किंवा सोहा अली खानची मुलगी इनाया असो. दोघांचेही व्हिडीओ सोशल मीडियावर हिट होतात.  कुणाल खेमू आणि सोहा अली खानची मुलगी इनाया खानचा आणखी एक व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी तैमुरप्रमाणेच Cute असणाऱ्या त्याच्या बहिणीचा अर्थात इनायाचा Cute आवाजात गायत्रीमंत्र म्हणताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर बाबा कुणाल खेमूबरोबर अजब भाषेत संवाद करताना देखील इनाया दिसली होती. या दोन्ही व्हिडीओंना सोशल मीडियावर खूप प्रसिद्धी मिळाली होती. आता इनायाचा आणखी व्हिडीओ समोर आला आहे.

या नवीन व्हिडीओमध्ये देखील इनाया तिच्या Cute अंदाजात दिसत आहे. तिच्या घरातील साफसफाई चालू असताना मध्येच लुडबूड न करता इनाया साफसफाईमध्ये मदत करत आहे. साफसफाईदरम्यान ती तिच्यामध्येच गुंग आहे. साफसफाईवेळी मस्ती करण्याचा तिचा अंदाज अनेकांना पसंत आला आहे. VOOMPLA या इन्स्टाग्राम पेजने इनायाचा हा व्हिडीओ शेअर केला असून 'इनायाचं Sunday Cleaning' असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. यामध्ये मस्त लोळत साफसफाई करताना इनाया दिसत आहे.

हा व्हिडीओ 41 हजारांहून अनेक युजर्सनी पाहिला असून यावर हजारो कमेंट्स देखील आल्या आहेत. अनेकांनी इनाया अगदी सोहा अली खान सारखी दिसत असल्याची कमेटं केली आहे.

First published: February 24, 2020, 7:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading