जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / खिलाडीच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सूर्यवंशी होतोय लवकरच प्रदर्शित; अक्षयने शेअर केली डेट

खिलाडीच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सूर्यवंशी होतोय लवकरच प्रदर्शित; अक्षयने शेअर केली डेट

खिलाडीच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सूर्यवंशी होतोय लवकरच प्रदर्शित; अक्षयने शेअर केली डेट

सूर्यवंशी चित्रपटाची रिलीझ डेट पुन्हा एकदा बदली आहे. 3 दिवस अगोदरच सूर्यवंशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 फेब्रुवारी : बॉलिवूडचा बहुप्रतीक्षित चित्रपट सुर्यवंशी आता लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुन्हा एकदा बदलीय. चार दिवस अगोदरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 27 मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. आता मात्र तो 3 दिवस अगोदरचं म्हणजेच 24 तारखेलाच रिलीज होणार आहे.कतरिना कैफ या चित्रपटात अक्षयसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार सोबतच अजय देवगण, रणवीर सिंह देखिल या चित्रपटात पाहयला मिळणार आहेत. विशेष म्हणजे मुबंईत 24 तास पाहता येणारा सुर्यवंशी हा पहिला चित्रपट ठरणार आहे. येत्या 24 तारखेपासून मुंबईतील चित्रपटगृह 24 तास सुरू राहणार आहेत. त्यामुळे खिलाडीचा हा चित्रपट 24 तारखेला संध्याकाळी 6 वाजता प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने याविषयक ट्विटवर एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे.

जाहिरात

अक्षय कुमारनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रणवीर 24 तारखेला होकार देतो त्यानंतर सिंघम आणि शेवटी सुर्यवंशी म्हणजेच अक्षय कुमार हा चित्रपट 24 तारखेला रिलीज होणार असल्याचं सांगतोय. ’ अपराध का कोई समय नहीं है, आ रही है पुलिस’ असं कॅप्शन देत अक्षय कुमारनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. गुढीपाडव्याच्या सुट्टीचा ‘सुर्यवंशी’ला फायदा होणार? 25 मार्चला गुढीपाडव्याची सुट्टी आहे त्यामुळे सुर्यवंशी चित्रपटाच्या टीमने 24 मार्चलाच संध्याकाळी हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुट्टीच्या आदल्याचं दिवशी या चित्रपटचा घेवू शकणार आहेत. अक्षय-रोहित सोबत कटरीनाचा नवा चित्रपट एका मुलाखतीमध्ये कटरीना कैफनं अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी सोबत काम करण्याचे काही किस्से शेअर केलेत. अक्षय आणि रोहित सोबत काम करताना खुप मज्जा आली. आता चित्रपट पदर्शित होण्याची वाट पाहत असल्याचं यावेळी कटरिनानं सांगितलंय. विशेष म्हणजे 9 वर्षानंतर अक्षय आणि कतरिनाची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. कटरिनाचा रोहित शेट्टी सोबतचा हा पहिला चित्रपट असणार आहे. ‘सिंघम’मध्ये अजय देवगन आणि ‘सिंबा’मध्ये रणवीर सिंहला पोलिसाच्या भूमिकेत सादर केल्यानंतर आता त्याने अक्षय कुमारला पसंती दिली आहे. त्यामुळे या तिन्ही सिंघमचे अॅक्शन सीन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात