मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रियांका चोप्राच्या घरी पडली होती IT विभागाची धाड, उघडला होता शाहिदनं दरवाजा

प्रियांका चोप्राच्या घरी पडली होती IT विभागाची धाड, उघडला होता शाहिदनं दरवाजा

करिनानंतर शाहिद कपूरसोबतच्या अफेअरबद्दल सर्वाधिक चर्चेत राहिली होती ती देसी गर्ल प्रियांका चोप्रा.

करिनानंतर शाहिद कपूरसोबतच्या अफेअरबद्दल सर्वाधिक चर्चेत राहिली होती ती देसी गर्ल प्रियांका चोप्रा.

करिनानंतर शाहिद कपूरसोबतच्या अफेअरबद्दल सर्वाधिक चर्चेत राहिली होती ती देसी गर्ल प्रियांका चोप्रा.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 25 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आज 39 वर्षांचा झाला. आज त्याला बॉलिवूडचा वैविध्यपूर्ण अभिनेता म्हणून ओळखलं जातं. पहिला सिनेमा ‘इश्क विश्क’ नंतरच शाहिद कपूर तरुणींच्या गळ्यातला ताईत झाला होता. या सिनेमानंतर बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अशी त्याची ओळख बनली होती. तसं पाहिलं तर अभिनयाचं कौशल्य वडील पंकज कपूर यांच्याकडून शाहिदला वारसा हक्कानं मिळालं होतं. पण ‘ताल’ आणि ‘दिल तो पागल हैं’ सारख्या सिनेमांमध्ये बॅकग्राउंड डान्सर ते ‘इश्क विश्क’चा लीड हिरो हा त्याचा प्रवास बराच कठीण होता. बॉलिवूडमध्ये येण्यासाठी त्यानं बरंच स्ट्रगल केलं. याचवेळी तो काही म्यूझिक व्हिडीओमध्येही दिसला.

शाहिदनं त्याच्या फिल्मी करिअरमध्ये बरेच चढ-उतार पाहिले. वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. कधी रोमान्स, कधी अ‍ॅक्शन तर कधी कॉमेडी शाहिदनं सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या. काही वेळा त्याला यश मिळालं तर कधी अपयशी ठरला. पण त्याच्या करिअर मध्ये काही असे सिनेमा आहेत जे प्रेक्षक अद्याप विसरू शकलेले नाहीत. ‘विवाह’, ‘जब वी मेट’, ‘कमीने’, ‘हैदर’, ‘उडता पंजाब’, ‘पद्मावत’ आणि ‘कबीर सिंह’ या त्याच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर गल्ला तर जमवलाच पण यासोबतच शाहिदच्या अभिनयानं प्रेक्षकांची वाहवा मिळावली.

सोहा अली खानच्या मुलीने काय केलं पाहा, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'How Sweet'

View this post on Instagram

Pick your favourite watch styles by Tommy Hilfiger at great prices on #Myntra. Flaunt yours today! "

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

फक्त फिल्म करिअरमध्येच नाही तर आपल्या खासगी जीवनातही शाहिदनं बरेच चढ उतार पाहिले. करिना कपूरसोबतचं त्याचं अफेअर बरंच गाजलं. त्यांनी या नात्याची कबुली सर्वांसमोरही दिली होती. पण त्याच्या नात्यात अखेर दुरावा आलाच. 2007 मध्ये ‘जब वी मेट’ सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी या दोघांमध्ये भांडणं झाली आणि हे नातं अखेर संपलं.

दिशा पाटनीचे जबरदस्ती काढले फोटो, बॉडीगार्डने धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ VIRAL

करिना कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शाहिदचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं. पण करिनानंतर शाहिद कपूरसोबतच्या अफेअरबद्दल सर्वाधिक चर्चेत राहिली होती ती देसी गर्ल प्रियांका चोप्रा. 2009 मध्ये आलेल्या ‘कमीने’ सिनेमाच्या वेळी या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या. या सिनेमातील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.

View this post on Instagram

#jersey the prep begins.

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

प्रियांका चोप्रा आणि शाहिदच्या अफेअरच्या चर्चा सुरू असतानाच प्रियांकाच्या घरावर इनकम टॅक्स विभागाची धाड पडली होती. जेव्हा आयकर विभागाचे कर्मचारी तिच्या घरी पोहोचले तेव्हा तिच्या घराचा दरवाजा शाहिदनं उघडला होता. ही गोष्ट त्यावेळी सगळीकडे पसरली होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2012 मध्ये आलेल्या त्यांच्या ‘तेरी मेरी कहानी’ या सिनेमाच्या रिलीज अगोदरच या दोघांचं नातं संपलं होतं. दरम्याच्या काळात या दोघांनी रिलेशनशिप बद्दल कधीच कबुली दिली नाही. आज प्रियांका निक जोनसोबत तिच्या संसारात रमली आहे तर शाहिदनं 2015 मध्ये मीरा राजपूतशी लग्न केलं. आज तो 2 मुलांचा बाप आहे.

View this post on Instagram

❤️ happy Diwali everyone. Hope you spent it with those who matter most.

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

शाहिदच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर त्याच्या कबीर सिंह या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सध्या तो त्याचा आगामी सिनेमा 'जर्सी'च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमात तो मृणाल ठाकूरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमात त्याचे वडील पंकज कपूर सुद्धा दिसणार आहेत. हा सिनेमा 28 ऑगस्टला रिलीज होत आहे.

कोरोनाग्रस्त चिनी फॅन्ससाठी आमीर खान चिंताग्रस्त, VIDEO द्वारे दिला संदेश

First published:

Tags: Bollywood