जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आता फ्रीमध्ये पाहू शकता 'तान्हाजी', कसं? इथे वाचा

आता फ्रीमध्ये पाहू शकता 'तान्हाजी', कसं? इथे वाचा

आता फ्रीमध्ये पाहू शकता 'तान्हाजी', कसं? इथे वाचा

आता तान्हाजी सिनेमाबाबत आणखी एक गुड न्यूज आहे ती म्हणजे हा सिनेमा आता फ्रीमध्ये पाहता येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 07 मार्च : अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रिलीज झालेल्या या सिनेमाची क्रेझ अद्याप संपलेली दिसत नाही. त्यामुळेच की काय मध्यंतरीच्या काळात आलेला कोणताही सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. या सिनेमाच्या रिलीजला आता जवळापास 2 महिने पूर्ण झाले आहेत. पण अजूनही अनेक थिएटर्समध्ये हा सिनेमा सुरू आहे. पण आता या सिनेमाबाबत आणखी एक गुड न्यूज आहे ती म्हणजे हा सिनेमा आता फ्रीमध्ये पाहता येणार आहे. तान्हाजी सिनेमा आता प्रेक्षकांना मोफत पाहता येणार आहे. हॉटस्टार अ‍ॅपवर आता या सिनेमा उपलब्ध करण्यात आला असून या अ‍ॅपवरून तुम्ही आता हा सिनेमा डाउनलोड करुन पाहू शकता. पण यासाठी तुमचं या अ‍ॅपवर प्रिमियम अकाउंट असणं गरजेच आहे. जर तुम्ही हॉटस्टारचे प्रिमियम VIP सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला हा सिनेमा फ्रिमध्ये पाहता येऊ शकतो. या बद्दल अजय देवगणनं त्याच्या ट्विटरवरुन माहिती दिली. सनी लिओनी कठीण वर्कआउट करते तेव्हा… पाहा हा VIDEO

जाहिरात

अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘तान्हाजी’ सिनेमानं फक्त जानेवारीतच नाही तर फेब्रुवारीतही दमदार प्रदर्शन केलं. या सिनेमानंतर रिलीज झालेले ‘पंगा’, ‘जवानी जानेमन’, ‘मलंग’, ‘लव्ह आजकल’ सारखे सिनेमे मात्र बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकले नव्हते. यासोबतच या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ‘तान्हाजी’ हा पहिला सिनेमा ठरला. या सिनेमाची महाराष्ट्रात वेगळीच जादू पाहायला मिळाली. सलमान खानच बॉलिवूडचा ‘बाहुबली’, ‘या’ बाबतीत अक्षय-आमिरलाही टाकलं मागे देशभरात CAA आणि NRC चा वाद सुरू असतानाही ‘तान्हाजी’ सिनेमाच्या कमाईवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. जागतिक स्तरावर अशी सर्वाधिक कमाई करणारा ‘तान्हाजी’ हा चौथा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. या सिनेमात शरद केळकर, अजिंक्य देव, देवदत्त नागे, अमेय वाघ, शशांक शिंदे हे मराठी कलाकारही आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. करिनाची Instagram वर एंट्री, पहिल्याच पोस्टमध्ये शेअर केलं असं काही की…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात