Home /News /entertainment /

सनी लिओनी कठीण वर्कआउट करते तेव्हा... पाहा हा VIDEO

सनी लिओनी कठीण वर्कआउट करते तेव्हा... पाहा हा VIDEO

सनी लिओनीनं आपल्या सोशल मीडियावर आपल्या जिममधल्या वर्कआउटचा व्हिडीओ शेअर केला आहे. उलटी टांगलेल्या अवस्थेतला हा वर्कआउट सोपा नव्हता, असंही तिने कबुल केलं आहे.

  मुंबई, 06 मार्च: बॉलिवुडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. सनी आपल्या वेगवेगळ्या व्हिडीओ,फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. सनीने सोशल मीडियावर तिचा जिममधला व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सनी आपल्या जिम स्ट्रेनरसोबत कठीण एक्सरसाइज करताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ शेअर करताना सनी लिओनीने आपल्या चाहत्यांना संदेश दिला आहे. ‘अनेकजण परफेक्ट वर्कआउट करताना पाहायला मिळत, मात्र हे वर्कआउट करणं फार कठीण असतं आणि यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो, मी पहिला प्रयत्न केला आहे. पुढे यात बदल करून यापेक्षा अधिक चांगला वर्कआऊट चांगला करणार आहे.’ असं तिनं आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे. सनीने आपल्या ट्रेनरचे देखील आभार मानले आहेत.
  सनी लिओनीने 2012 मध्ये बॉलिवुडमध्ये एंट्री घेतली.’जिस्म 2’ या सिनेमातून तिनं अनेकांना घायाळ केलं. लवकरच तिचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कोका कोला’, ‘रंगीला’ या चित्रपटांमधून ती आपला जलवा दाखवणार आहे. या चित्रपटांची देखील चाहते वाट पाहत आहेत. अन्य बातम्या सारानं शेअर केले इब्राहिमसोबतचे BIKINI फोटो; नेटकरी म्हणाले, ‘थोडी तरी लाज...' करिनाची Instagram वर एंट्री, पहिल्याच पोस्टमध्ये शेअर केलं असं काही की...
  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: Sunny Leone, Viral video.

  पुढील बातम्या