मुंबई, 06 मार्च : बॉलिवूडचे जवळपास सर्वच कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसतात. पण अशात काही सेलिब्रेटी असेही आहेत जे सोशल मीडियापासून खूप दूर राहतात. सोशल मीडियामध्ये सध्या इन्स्टाग्राम हे सर्वाधिक लोकप्रिय असं माध्यम आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी सुद्धा इन्स्टाग्रामच्या माध्यामातून त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधतात. यात आता करिना कपूर खानची सुद्धा एंट्री झाली आहे. पण तिच्या पहिल्याच पोस्टमध्ये तिनं असं काही शेअर केलं की चाहते सुद्धा हैराण झाले आहेत.
करिना कपूरला लाइक्स आणि कमेंटच्या जगापासून दूर राहायचं होतं. तिने अनेक मुलखतींमध्ये बोलताना, मला माझं पर्सनल लाइफ सोशल मीडियापासून दूर ठेवायचं आहे असं सांगितलं होतं. पण अखेर तिनं आता इन्स्टाग्राम डेब्यू केला आहे. त्यामुळे तिचे चाहते खूप खूश असलेले पाहायला मिळत आहेत. काही तासांतच तिला अनेक लोकांनी फॉलो केलं आहे. याशिवाय अमृता अरोड़ा, कृति सेनन, मनीष मल्होत्रा, सोनम कपूर, परिणीति चोप्रा यांनी फॉलो केलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी सांगूनही अर्थसंकल्पाच्या भाषणात अजित पवारांनी केली मोठी चूक
करिना कपूरनं काल इन्स्टाग्रामवर अकाउंट ओपन केल्यानंतर पहिल्याच पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात एक मांजर दिसत होती. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं Coming Soon असं लिहिलं होतं. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तिच्या इन्स्टग्राम डेब्यूविषयी आनंद व्यक्त केला होता.
मालिकांमधील वादावर भडकली तेजश्री प्रधान, म्हणाली ‘मी ब्राह्मण नाही पण मला...’
त्यानंतर आज दुसऱ्या पोस्टमध्ये करिनानं तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती ब्लॅक गोल्डन आउटफिट्समध्ये दिसत आहे. याशिवाय तिच्या कानात मांजरीचे कानातले दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिनं लिहिलं, ‘…अँड कॅट आऊट ऑफ द बॅग’
करिना कपूरचं याआधी एक फॅनपेज आहे ज्यावर तिचे 7 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पण आता हे तिचं ऑफिशिअल अकाउंट आहे. मात्र हे अकाउंट सुद्धा ती स्वतः हॅन्डल करणार नसल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. या अकाउंटवरून तिच्या कामासंबंधी डिटेल्स शेअर केले जाणार आहेत.
‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका...’ मालिका वादात शशांक केतकरची उडी