अजय देवगणच्या ‘तान्हाजी’चा जागतिक स्तरावर नवा विक्रम, केली इतक्या कोटींची कमाई

अजय देवगणच्या ‘तान्हाजी’चा जागतिक स्तरावर नवा विक्रम, केली इतक्या कोटींची कमाई

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रिलीज झालेल्या 'तान्हाजी' सिनेमाची क्रेझ अद्याप संपलेली दिसत नाही.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी : अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या तान्हाजी द अनसंग वॉरियर या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रिलीज झालेल्या या सिनेमाची क्रेझ अद्याप संपलेली दिसत नाही. त्यामुळेच की काय मध्यंतरीच्या काळात आलेला कोणताही सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. या सिनेमाच्या रिलीजला आता जवळापास 41 दिवस पूर्ण झाले आहेत आणि यासोबतच या सिनेमानं जागतिक स्तरावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

अजय देवगणच्या तान्हाजी सिनेमानं भारतासह परदेशातील प्रेक्षकांनाही वेड लावलं होतं. या सिनेमानं 41 दिवसांत जगभरात तब्बल 347 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिस इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार या कमाईसोबत ‘तान्हाजी’ जगभरात सर्वाधिक कमाई करणारा 16 वा सिनेमा ठरला. सिनेमा रिलीज झाल्यावर या सिनेमानं प्रति दिन 50 ते 60 लाखांची कमाई केली होती. त्यावरुन फक्त भारतात या सिनेमाचा कमाई 274 कोटी रुपये एवढी आहे.

मलायकाशी घटस्फोटावर अरबाज म्हणतो, आमच्यात सर्वकाही ठिक होतं पण...

 

View this post on Instagram

 

Witness history like never before. Presenting the official #TanhajiTrailer: (Link In Bio) @kajol #SaifAliKhan @omraut @bhushankumar @sharadkelkar #AjayDevgnFFilms @tseries.official @tseriesfilms @tanhajifilm

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या तान्हाजी सिनेमानं फक्त जानेवारीतच नाही तर फेब्रुवारीतही दमदार प्रदर्शन केलं. या सिनेमानंतर रिलीज झालेले पंगा, जवानी जानेमन, मलंग, लव्ह आजकल सारखे सिनेमे मात्र बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकले नव्हते. यासोबतच या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा तान्हाजी हा पहिला सिनेमा ठरला. या सिनेमाची महाराष्ट्रात वेगळीच जादू पाहायला मिळाली.

लग्नाआधीच कृती सेनन आहे प्रेग्नन्ट? सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा

देशभरात CAA आणि NRC चा वाद सुरू असतानाही तान्हाजी सिनेमाच्या कमाईवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. जागतिक स्तरावर अशी सर्वाधिक कमाई करणारा तान्हाजी हा चौथा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. या सिनेमात शरद केळकर, अजिंक्य देव, देवदत्त नागे, अमेय वाघ, शशांक शिंदे हे मराठी कलाकारही आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे.

भूमि पेडणेकर ते विद्या बालनपर्यंत, डब्बू रत्नानीसाठी अभिनेत्री झाल्या BOLD

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2020 10:47 AM IST

ताज्या बातम्या