मुंबई, 19 फेब्रुवारी : अभिनेत्री कृती सेनन सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात ती प्रेग्नन्ट असलेली दिसत आहे. तसेच नेहमी स्लिम ड्रीम दिसणारी कृतीचं वजन सुद्धा बरंच वाढलेलं या फोटोंमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे कृती खरंच प्रेग्नन्ट आहे की आणखी काही अशा उलट-सुलट चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. सोशल मीडियावर कृतीचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या आहेत. कृती सेनन लग्नाआधीच प्रेग्नन्ट आहे असं बोललं जात आहे. मात्र या मागचं सत्य काही वेगळंच आहे. कृतीचे हे फोटो तिचा आगामी सिनेमा ‘मिमी’च्या सेटवरील आहे. या सिनेमात कृती सरोगेट मदरच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. या दरम्यान सेटवरील कृतीचे हे फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर नागराज मंजुळे करणार 3 सिनेमांची निर्मिती
Exclusive- @kritisanon from the sets of Mimi !
— Kriti Sαnon's caƒe (@KritiSanonCafe) February 18, 2020
RT if you can't wait to watch her play yet another fabulous role onscreen. 😍#Mimi #KritiSanon pic.twitter.com/1tmshujj3U
कृती सेननचा हा सिनेमा मराठीतील ‘मला आई व्हायचंय’ या उर्मिला कानेटकर-कोठारेच्या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. ही कथा एका दापत्यासाठी सरोगेट मदर होण्यासाठी तयार होते मात्र तिचा हा निर्णय पुढे तिचं पूर्ण आयुष्यचं बदलून टाकतो. या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत. या सिनेमात पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक आणि पाहवा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘बापरे! हा तर डेंजर झोन’ असं म्हणून पळत सुटल्या रेखा, पाहा VIDEO
या सिनेमासाठी कृती सेनननं तब्बल 15 किलोनी तिचं वजन वाढवलं आहे. कोणत्याही अभिनेत्रीसाठी एखाद्या सिनेमासाठी असं वजन वाढवणं खूप मोठी रिस्क वाटते मात्र कृतीनं या सिनेमातील भूमिका जिवंत करण्यासाठी हे आव्हान पेललं आहे. या सिनेमासाठी तिनं बरीच मेहनत घेतली आहे. कृतीच्या अगोदर अभिनेत्री भूमि पेडणेकरनं तिचा पहिला सिनेमा ‘दम लगा के…’साठी वजन वाढवलं होतं. या सिनेमानं भूमिला वेगळी ओळख दिली. TOPLESS फोटोशूट केल्यानंतर नेटकऱ्यांनी कियारा अडवाणीला घातले कपडे