'तारक मेहता...' आणखी एक धक्का, आता 'या' अभिनेत्रीनं सोडला शो

'तारक मेहता...' आणखी एक धक्का, आता 'या' अभिनेत्रीनं सोडला शो

या शोमधील मुख्य अभिनेत्री दिशा वकानी सुद्धा बऱ्याच काळापासून शोमधन बाहेर आहे. अशातच या शो ला आणखी एक धक्का बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : तारक मेहता का उल्टा चष्मा हा टीव्ही शो मागच्या एक दशकापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. टीआरपी लिस्टमध्येही या शोनं आपलं स्थान टॉप 5 मध्ये कायम ठेवलं आहे. दरम्यानच्या काळात या शोमधून अनेक नव्या कलाकारांनी छोट्या पडद्यावर एंट्री घेतली. तर काहींना या शोला अलविदा सुद्धा केलं. टप्पूची भूमिका साकारणाऱ्या भव्य गांधीनं काही दिवसांपूर्वी हा शो सोडला. त्यानंतर निधी भानुशालीनं सुद्धा शोमधून बाहेर पडली. तर दुसरीकडे मुख्य अभिनेत्री दिशा वकानी सुद्धा बऱ्याच काळापासून शोमधन बाहेर आहे. अशातच या शो ला आणखी एक धक्का बसला आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत ‘बावरी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरियानंही आता हा शो सोडल्याचं समोर येत आहे. स्पॉटबॉयईनं दिलेल्या वृत्तानुसार मोनिका तिला मिळाणाऱ्या मानधनावर खूश नव्हती. तिनं मेकर्सकडून तिचं मानधन वाढवून देण्याची मागणी केली होती. पण बऱ्याच वेळा सांगूनही त्यांनी मानधन वाढवून न दिल्यामुळे मोनिकानं अखेर हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. याविषयी मोनिकाला विचारलं असता तिनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

इंजिनियरिंग सोडून गाठलं होतं बॉलिवूड, आता अक्षय कुमारवर भारी पडतोय हा अभिनेता

View this post on Instagram

If you focus on the hurt u ll continue to suffer. if you focus on the lessons you ll continue to grow.😊

A post shared by Monika sushma bhadoriya (@monika_bhadoriya) on

शो सोडण्यामागे आहे हे कारण

‘तारक मेहता...’ मधील आपल्या प्रवासाबद्दल बोलताना मोनिका म्हणाली, ‘शो आणि त्यातील भूमिका निश्चितच माझ्यासाठी खूप जवळची आहे. पण मला त्यानुसार चांगल्या मानधनाची अपेक्षा होती मात्र याविषयी मेकर्सशी चर्चा केल्यानंतर ते माझ्या मागणीशी सहमत नव्हते. जर ते माझं मानधन वाढवणार असतील तर मला या शोमध्ये परत येण्यास कोणतीही समस्या नाही. पण ते ही गोष्ट मान्य करतील असं मला अजिबात वाटत नाही. मी आता या शोची सदस्य नाही आहे.’

लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर अनु मलिक यांनी सोडला 'इंडियन आयडॉल' शो?

मोनिका मागच्या 6 वर्षांपासून या शोमध्ये काम करत होती. तिनं तिचा लास्ट एपिसोड 20 ऑक्टोबरला शूट केला. या शोमधील तिची भूमिका खूपच मनोरंजक होती. प्रत्येक वेळी बोलला जाणारा 'हाय-हाय गलती से मिस्टेक हो गई' हा तिचा डायलॉग सर्वांनाच खूप हसवत असे. याशिवाय जेठालालला तिनं सतवणं, त्याला नावं ठेवणं प्रेक्षकांना आवडत असे. याशिवाय शोमधील बावरी आणि बाघाचा रोमान्स हा सुद्धा एक मनोरंजक पॉइंट होता. मोनिकानं याच शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.

वेळेचं कोडं सोडवण्यात 'ती' होईल का यशस्वी? पाहा Vicky Velingkar चा थरारक Trailer

===================================================================

First published: November 22, 2019, 2:39 PM IST

ताज्या बातम्या