जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / वेळेचं कोडं सोडवण्यात 'ती' होईल का यशस्वी? पाहा Vicky Velingkar चा थरारक Trailer

वेळेचं कोडं सोडवण्यात 'ती' होईल का यशस्वी? पाहा Vicky Velingkar चा थरारक Trailer

वेळेचं कोडं सोडवण्यात 'ती' होईल का यशस्वी? पाहा Vicky Velingkar चा थरारक Trailer

सोनाली कुलकर्णीचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘विक्की वेलिंगकर’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 नोव्हेंबर : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला ‘विक्की वेलिंगकर’ सिनेमा मागच्या काही काळापासून खूप चर्चेत आहे. या सिनेमाचे पोस्टर्स रिलीज झाल्यानंतर त्यातील मास्क मॅनच्या पोस्टरनं प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली होती. याशिवाय यासिनेमाच्या अत्यंत गुढ आणि रहस्यमय अशा टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळला. त्यानंतर आता या बहुप्रतीक्षित सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्याला सोशल मीडियावर खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सोनाली कुलकर्णी ही ‘विक्की वेलिंगकर’च्या भूमिकेत दिसत असून ती एक कॉमिक बूक आर्टिस्ट आहे. तिचे पुस्तक आणि घड्याळाचे दुकान असून या ट्रेलरमध्ये ती कोणापासून तरी पळताना दिसत आहे. पण ती कोणापासून, कशासाठी आणि किती वेळ पळणार आहे याचे उत्तर तिच्याकडे नसून ती हे वेळेचं कोडे सोडविण्याचा प्रयत्न करते आहे. पुढे या ट्रेलरमध्ये ‘मास्क मॅन’ देखील दिसत असून ती त्याच्यापासून पळते आहे असे लक्षात येते. हे वेळेचे कोडे उलघडण्यासाठी तिला तिचा हॅकर मित्र, विद्या आणि पबजी आजी मदत करताना दिसत आहे. हा ट्रेलर बघितल्यानंतर “ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?, मास्क मॅन नक्की कोण आहे? हा वेळेचा नक्की काय खेळ आहे, चित्रपटामध्ये वेळेचा, विक्की, विद्या, आणि मास्क मॅनचा नक्की काय संबंध आहे, असे अनेक प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे सिनेमाबद्दलची उत्कंठा अधिकच ताणली गेली आहे.

या सिनेमामध्ये विक्कीची भूमिका सोनाली कुलकर्णी हिने साकारली असून स्पृहा जोशीने विद्या, संग्राम समेळने हॅकर मित्राची तर रमा जोशी यांनी पबजी आजीची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या सिनेमाची नायिका ही या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची ही कथा आहे, ‘मिकी व्हायरस’ आणि ‘7 अवर्स टू गो’ अशा बॉलिवूड सिनेमाचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनीच ‘विक्की वेलिंगकर’चं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची निर्मिती जीसिम्स, लोकीज स्टुडीओ आणि डान्सिंग शिवा प्रॉडक्शन यांनी केली आहे. ‘विक्की वेलिंगकर’ येत्या 6 डिसेंबर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात