लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर अनु मलिक यांनी सोडला 'इंडियन आयडॉल' शो?

लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर अनु मलिक यांनी सोडला 'इंडियन आयडॉल' शो?

2018 मध्ये सोना मोहपात्रानं पहिल्यांदा अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला होता.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : बॉलिवूडचे प्रसिद्ध संगतीकार आणि गायक अनु मलिक यांच्यावर मागच्या बऱ्याच काळापासून टीकेची झोड उठलेली आहे. जेव्हा बॉलिवूडमध्ये मी टू चळवळीचं लोन आल्यावर अनु मलिक यांच्यावर धक्कादायक आरोप झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत कोणत्या ना कोणत्या आरोपामध्ये ते घेरले गेले आहेत. काही दिवसांपासून ते सिंगिंग रिअलिटी शो इंडियन आयडॉलच्या 11 व्या सीझनमध्ये परीक्षक म्हणून दिसत आहेत. पण आता अनु मलिक यांनी हा शो मध्येच सोडल्याचं बोललं जात आहे. पण या कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून किंवा अनु मलिक यांच्याकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण हा शो सोडण्याचं कारण त्यांच्यावर असलेले लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. असं म्हटलं जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार अनु मलिक यांनी हा शो सोडला असून या शोमधील त्यांची जागा कोण घेणार हे मात्र अद्याप समजलेलं नाही. इंडियन आयडॉल 11 मध्ये अनु मलिक जज म्हणून काम पाहत होते. हा शो सोनी टीव्ही वरुन प्रसारित केला जातो. असं म्हटलं जातंय की सोनी टीव्हीला राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस मिळाली आहे. ही नोटीस महिला आयोगाच्या आफिशिअल ट्विटर अकाउंटवरही शेअर करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाकडून काढण्यात आलेल्या या नोटीसमध्ये गायिका सोना मोहपात्राच्या ट्वीटचा उल्लेख करण्यात आला आहे आणि चॅनेलकडून अनु मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचं स्पष्टीकरण मागितलं आहे. 2018 मध्ये सोना मोहपात्रानं पहिल्यांदा अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला होता. त्यावेळी अनु मलिक यांना इंडियन आयडॉल 10 सुद्धा अर्ध्यावरुनच सोडावा लागला होता. त्यानंतर गायिका नेहा भसीन आणि श्वेता पंडित यांनी सोनाला पाठिंबा देत अनु मलिक यांच्यावर अनेक आरोप लावले होते.

सोनी टीव्हीनं 11 व्या सीझनमध्ये पुन्हा एकदा अनु मलिक यांना परीक्षक म्हणून साइन केल्यावर सोना मोहपात्रानं पुन्हा एकदा अनु मलिक यांच्या विरोधात आवाज उठवला. काही दिवसापूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्तानं सुद्धा सोना मोहपात्राला पाठिंबा दिला होता. तर अनु मलिक यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांच्यावर लावण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप हे बिनबुडाचे आणि चुकीचे असल्याचं म्हटलं होतं.

======================================================================

Published by: Megha Jethe
First published: November 22, 2019, 9:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading