मुंबई, 22 नोव्हेंबर : बॉलिवूडमध्ये प्रत्येक वर्षी नवे चेहरे येताक. काही चेहरे यशस्वी ठरतात तर काहींना मात्र एक-दोन सिनेमांनंतर रिकाम्या हाती परतावं लागतं. सध्या तर बॉलिवूडमधील स्टार किड्स एका मागोमाग एक बॉलिवूड पदार्पण करत आहेत. पण यातही काही आउटसायरडर्स स्टार किड्सना मागे टाकत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अशी ओळख असणाऱ्या कार्तिकचा आज 29 वा वाढदिवस. कार्तिकनं अभिनयाच्या जोरावर स्वतःला असं सिद्ध केलं आहे की तो सध्या आघाडीच्या अभिनेत्यांवरही भारी पडताना दिसत आहे. इतकंच नाही तर बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री सुद्धा त्याच्यावर अशा फिदा आहेत की त्यांनी कार्तिवर क्रश असल्याची जाहीर कबुली देऊन टाकली आहे. सध्या बॉलिवूडमध्ये चांगलाच जम बसवलेल्या कार्तिरृक या गोष्टीचा कधीच अंदाज नव्हता की तो कधी अभिनया क्षेत्रात येईल आणि एवढा मोठा स्टार होईल. बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याआधी कार्तिकनं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. कार्तिकनं मॉडेलिंगपासून त्याच्या करिअरची सुरुवात केली आणि मग सुरु झाला कामाच्या शोधात स्टुडिओमध्ये चकरा मारण्याचा सिलसिला. बरेच परिश्रम घेतल्यानंतर 2011 मध्ये त्याला ‘प्यार का पंचनामा’ हा पहिला सिनेमा मिळाला. लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर अनु मलिक यांनी सोडला ‘इंडियन आयडॉल’ शो?
कार्तिकच्या पहिल्या सिनेमाला खूप यश मिळालं. पण त्यानंतर आलेले त्याचे काही सिनेमे पूर्णतः फ्लॉप ठरले. त्यानंतर आलेल्या ‘प्यार का पंचनामा 2’ने मात्र कार्तिकचं करिअर सांभाळलं. त्यानंतर कार्तिकनं ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘लुका छुपी’ सारखे हिट सिनेमे दिले. याशिवाय त्याच्याकडे ‘पति पत्नी और वो’, ‘भूल भूलैया-2’ आणि ‘लव आज कल 2’ हे सिनेमा आहेत. याशिवाय तो हेरा फेरीच्या तिसऱ्या पार्टसाठी विचारण्यात आल्याचंही बोललं जात आहे. अनेक संकटांवर मात करुन हे सेलिब्रेटी आले एकत्र, फिल्मी आहे लव्हस्टोरी कार्तिक आर्यनच्या आगामी सिनेमांच्या लिस्टमध्ये 2 सिनेमा असे आहेत ज्यात अभिनेता अक्षय कुमारनं काम केलं होतं पण त्यांच्या सिक्वेलसाठी मात्र निर्माता आणि दिग्दर्शकांनी कार्तिकला पसंती दिली आहे. त्यामुळे कार्तिक सध्या अक्षय कुमारवर भारी पडत असल्याचं चिन्ह आहे. अक्षय कुमारच्या भूल भूलैया आणि हेरी फेरी या सिनेमांच्या सिक्वेलसाठी कार्तिकला पंसती दिल्याच दिसतं.
काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनचं नाव पतौडी प्रिन्सेस सारा अली खानशी जोडलं गेलं होतं. हे दोघं अनेकदा एकत्र स्पॉट सुद्धा मात्र आता त्यांच्यात दुरावा आल्याचं बोललं जात आहे. करण जोहरच्या चॅट शोमध्ये सारा अली खाननं कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. याशिवाय त्याचं नाव अभिनेत्री अनन्या पांडेशी सुद्धा जोडलं गेलं होतं. पुन्हा एकदा बिकिनी लुकमध्ये दिसली टायगर श्रॉफची बहिण, पाहा HOT PHOTO ===============================================

)







