मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /14 वर्ष हिट राहिलेल्या 'तारका मेहता' शोला डारेक्टरनं का ठोकला रामराम? रीटा रिपोर्टरनं केला खुलासा

14 वर्ष हिट राहिलेल्या 'तारका मेहता' शोला डारेक्टरनं का ठोकला रामराम? रीटा रिपोर्टरनं केला खुलासा

डायरेक्टर मालव राजदाने सोडली तारक मेहता मालिका

डायरेक्टर मालव राजदाने सोडली तारक मेहता मालिका

डायरेक्टर मालव राजदा यांनी तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो सोडल्याचं समोर आलं आहे. 14 वर्ष हिट ठरलेल्या तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो मालवने का सोडला असा प्रश्न सर्वांना पडला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 जानेवारी : टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ज्याकडे पाहिलं जातं तो कार्यक्रम म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'.  मागील 14 वर्ष तारक मेहता हा शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. पण मागच्या काही वर्षात मालिकेतील कलाकार मालिकेला रामराम करताना दिसत आहेत.  मालिकेतून दया बेननं मालिका सोडली आणि त्यानंतर मालिकेतून एक एक कलाकार एक्झिट घेऊ लागला आहे. आतापर्यंत अभिनेत्री दिशा वकानी, अभिनेते शैलेश लोढा, नेहा मेहता, झील मेहता, राज अनादकट सारख्या अनेक कलाकारांनी मालिका सोडली. पण आता मालिकेच्या डायरेक्टरनं देखील मालिका सोडल्याचं समोर आलं आहे. डायरेक्टर मालव राजदा यांनी तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो सोडल्याचं समोर आलं आहे. 14 वर्ष हिट ठरलेल्या तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो मालवने का सोडला असा प्रश्न सर्वांना पडला.

डायरेक्टर मालव राजदा यांने मालिका सोडल्यानंतर आता मालिकेतील रीटा रिपोर्टर म्हणून दिसणारी अभिनेत्री प्रिया आहूजा देखील मालिका सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रिया ही प्रत्यक्षात मालव राजदाची पत्नी आहे. दोघेही मालिकेत एकत्र काम करत होते. प्रियानं मात्र यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाहीये.

हेही वाचा - टेलिव्हिजनवर का दाखवत नाहीत रितेश जिनिलियाचा 'तुझे मेरी कसम'? 20 वर्षांनी कारण आलं समोर

प्रियानं फिल्मी बीटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, 'मालव तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. आम्ही एकमेकांच्या आयुष्यात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तारक मेहता प्रमाणेच आमच्या नात्यानंही 14 वर्ष पूर्ण केली आहेत'.  तारक मेहताच्या सेटवरचं मालव आणि प्रिया यांच्यी नात्याला सुरूवात झाली होती. सेटवर दोघांची मैत्री आणि त्यानंतर ते प्रेमात पडले. दोघांनी 2011मध्ये लग्न केलं. दोघांनी काय पर्सनल आणि प्रोफेशन लाईफमध्ये अंतर ठेवलं.

मालवने तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो सलग 14 वर्ष हीट होण्यात आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडण्यासाठी डायरेक्टर मालव राजदा याचा मोठा वाटा आहे. या शोसाठी त्यानं रात्रंदिवस मेहनत घेतल्याचं पत्नी प्रियानं सांगितलं. मीडिया रिपोर्टनुसार, मालव राजदा आणि तारक मेहताच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काही मतभेद सुरू होते. यामुळेच मालवनं शो सोडला आहे.

First published:

Tags: Marathi news, Tv actors, TV serials