मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

TMKOC : 'दया बेन' दिशा वकानीबद्दल धक्कादायक माहिती खरी की खोटी?

TMKOC : 'दया बेन' दिशा वकानीबद्दल धक्कादायक माहिती खरी की खोटी?

दिशा वाकाणी

दिशा वाकाणी

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत दया बेनची भूमिका करणारी दिशा वकानीबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे.अनेक दिवसांपासून दिशा वकानी मालिकेत परत येणार अशा चर्चा रंगात होत्या.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई,  11 ऑक्टोबर : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सध्या खूपच चर्चेत आहे. मालिकेतील एक एक कलाकार एक्झिट घेत असले तरी आजही मालिकेची लोकप्रियता कायम आहे. नुकतेच मालिकेतील तारक मेहता साकारणारे शैलेश लोढा यांनी एक्झिट घेतली होती. त्यानंतर मालिकेत नवीन तारक पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता दया बेन मालिकेत कधी परतणार याकडे चाहते डोळे लावून बसले होते. अनेक दिवसांपासून दिशा वकानी मालिकेत परत येणार अशा चर्चा रंगात होत्या.मालिकेत दया बेनची भूमिका करणारी दिशा वकानीबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे.

दिशाला घशाचा कर्करोग झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.  ती घशाच्या कर्करोगाशी झुंजत आहे असं म्हटलं गेलं होतं. मात्र या बातम्या अफवा असल्याचं आता समोर आलं आहे.  'दया बेन' या व्यक्तिरेखेमुळे तिला घशाचा कर्करोग झालेला नाही असा खुलासा तिच्या भावानं केला आहे.  दिशा शोमध्ये विचित्र आवाजात बोलायची. मागच्या काही महिन्यांपासून दिशा वकानीबाबत अनेक बातम्या समोर येत होत्या. त्याचाच फायदा घेऊन क्लिक बीटसाठी हा प्रकार केल्याचं त्यानं म्हटलं आहे.

हेही वाचा - Sidharth-Kiara : ठरलं! सिद्धार्थ ​​आणि कियारा 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात; समोर आल्या डिटेल्स

दिशा वाकाणीने २०१९ मध्ये या शोला अलविदा केला होता. प्रसूती रजा म्हणून त्यांनी याचे कारण सांगितले. तेव्हापासून तिचे चाहते ती शोमध्ये परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शोमध्ये परतण्यासाठी निर्मात्यांनी अनेकदा तिच्याशी संपर्क साधला पण तिने नकार दिला. दिशा शोची सर्वात लोकप्रिय आणि आवडती अभिनेत्री होती.

दिशा वाकाणीने अनेकदा  दयाबेनच्या विचित्र आवाजाबद्दल तिचं  मत मांडलं होतं. एका मुलाखतीत  दिशाने सांगितले होते की, 'प्रत्येक वेळी तोच आवाज कायम ठेवणे खूप कठीण होते. पण देवाच्या कृपेने कधीही त्यांच्या आवाजाला इजा झाली नाही किंवा घशाची कोणतीही समस्या निर्माण झाली नाही.'' या आवाजाने ती दिवसाचे 11-12 तास सतत शूटिंग करत असे. दिशा वकानीला खरच कॅन्सर झालेला नसून या सगळ्या फक्त अफवाच आहेत.

दिशा वाकाणीने शो सोडल्यापासून तिची व्यक्तिरेखा संपली आहे. शो मध्ये तिची जागा दुसरं कोणीही घेऊ शकलेलं नाही. त्याऐवजी निर्माते नवीन अभिनेत्रीच्या शोधात आहेत. दरम्यान, दया बेनच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या सखुजा, काजल पिसाळ अशा अनेक अभिनेत्रींची नावे पुढे आली आहेत. मात्र, ती केवळ अफवा असल्याचे निष्पन्न झाले. दिशा गेल्यानंतर इतर अनेक कलाकारांनी शो सोडला.

First published:

Tags: Entertainment, Taarak mehta ka ooltah chashma, Tv actress, Tv celebrities