‘तारक मेहता का..’ मधील अभिनेत्याच्या दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू

मुलीच्या मृत्यूबद्दल कळताच ते दुसऱ्या दिवशी सकाळी राजकोटला जायला निघाले. तिथेच मुलीवर अंत्यसंस्कार केले जातील. या घटनेनंतर संपूर्ण टीव्ही जगतात दुःख व्यक्त केलं जात आहे.

News18 Lokmat | Updated On: May 10, 2019 12:33 PM IST

‘तारक मेहता का..’ मधील अभिनेत्याच्या दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू

मुंबई, 10 मे- टीव्ही अभिनेता प्रतीश वोरा यांच्या दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्टनुसार, प्रतीश यांची मुलगी एका खेळण्याने खेळत असताना त्या खेळण्याचा छोटासा तुकडा तिच्या गळ्यात अडकला. यामुळेच तिचा मृत्यू झाला. गुरुवारी प्रतीश हे चित्रीकरणासाठी घरातून निघणार होते. पण मुलीच्या मृत्यूची वार्ता कळताच ते तातडीने राजकोटसाठी रवाना झाले.

‘टेलीचक्कर’शी बोलताना प्रतीश वोरा म्हणाले की, काल 9 मे रोजी ही घटना घडली. खेळण्याचा एक भाग तिने तोंडात घातला आणि तो गिळला. एका रिपोर्टनुसार, मुलीच्या मृत्यूबद्दल कळताच प्रतीश दुसऱ्या दिवशी सकाळी राजकोटला जायला निघाले. तिथेच मुलीवर अंत्यसंस्कार केले जातील. या घटनेनंतर संपूर्ण टीव्ही जगतात दुःख व्यक्त केलं जात आहे.

'तू तुझी स्वस्तातली पब्लिसीटी कर, ती एक मुलाखत देईल आणि...', कंगना- ऋतिक वादाला आता नवं वळण
आता सरोगसीद्वारे बाबा होण्याचं प्लॅनिंग करतोय सलमान खान?
 

View this post on Instagram
 

Cuteness overloaded 😘 #cutebabies #family #indiancutebaby #littlebaby #cutiepie #babygirl #cutenessoverload


A post shared by Pratish Vora (@vorapratishofficial) on

सोनाली बेंद्रेला कॅन्सरमधून बाहेर काढायला ‘या’ अभिनेत्रीने केली सर्वात मोठी मदत

प्रतीश वोरा यांनी 'स्टार भारत' या वाहिनीवरील 'प्यार का पापड' मालिकेत नंदू गुप्ताची व्यक्तिरेखा साकारत आहे. याशिवाय त्यांनी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' आणि 'क्राइम पेट्रोल' या मालिकांमध्येही काम केलं आहे.

दिग्दर्शक अनुराग कश्यप का वैतागले पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2019 11:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close