मुंबई, 20 नोव्हेंबर :छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' कायमच चर्चेत असतो. मालिकेतील कलाकारही घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. प्रत्येक पात्राला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळत असतं. तारक मेहताच्या सेटवरील प्रत्येक बातमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असते. अशातच तारक मेहताच्या सेटवरुन एक चिंताजनक बातमी समोर आली होती. तारक मेहता का उल्टा चष्माचे 'चंपक चाचा' म्हणजेच अभिनेता अमित भट्टला सेटवर दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती. तेव्हापासून चाहते प्रचंड काळजीत होते. सोशल मीडियावर नेटकरी 'चंपक चाचा'च्या तब्येतीबद्दल विचारत होते. चाहत्यांची चिंता दूर करण्यासाठी आता खुद्द चंपक चाचा यांनी त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये 'चंपक चाचा'ची भूमिका साकारणाऱ्या अमित भट्टने मीडियावर सुरू असलेल्या बातम्यांचे खंडन करत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले कि, ''काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'चंपक चाचा' म्हणजेच अमित भट्ट यांचा भीषण अपघात झाल्याच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. मला सांगायचे आहे की या बातम्या खोट्या आहेत. तसे काहीही झालेले नाही. मला खूप किरकोळ दुखापत झाली आहे. मी आता एकदम ठीक आहे. मी तुमच्या समोर आहे.''
हेही वाचा - कोमात गेलेल्या Aindrila Sharma ची मृत्यूशी झुंज अपयशी, 24 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अमित भट्ट यांनी सांगितले की, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटवर एक सीन शूट केला जाणार होता, ज्यामध्ये सोढीच्या कारचा टायर हातातून सुटतो आणि तो त्याच्या मागे धावतो. शूटिंगदरम्यान रिक्षाला आदळल्यानंतर टायर मागे आला आणि 'चंपक चाचा' यांच्या गुडघ्यावर आदळला, त्यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली. डॉक्टरांनी 10 ते 12 दिवस विश्रांती घेण्यास सांगितले आहे.
View this post on Instagram
अमित भट्ट उर्फ चंपक चाचा हे या शोमधील सर्वात प्रिय पात्रांपैकी एक आहे आणि त्याचे ऑन-स्क्रीन जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्याशी असलेले त्यांचे बाँडिंग सर्वांना आवडते. अमित भट्ट खऱ्या आयुष्यात त्याचा ऑन-स्क्रीन मुलगा दिलीप जोशी यांच्यापेक्षा लहान असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. चंपक चाचाच्या डायलॉगवर अनेक मीम्सही व्हायरल होत असतात.
अमित भट्ट यांनी सांगितले की, तो गोकुळधाम आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या कुटुंबाला खूप मिस करत आहे. त्याला लवकर बरे होऊन शूटिंगला परत जायचे आहे. तसेच, त्याने त्याच्या चाहत्यांना काळजी करू नका असा सल्ला दिला आहे.
दरम्यान, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणारा शो बनला आहे. जेठालालपासून चंपक लाल आणि दयाबेनपर्यंत प्रत्येक पात्र चाहत्यांना खूप आवडते. शोमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. प्रत्येक पात्राची एक वेगळी विशेषता असून गेल्या अनेक वर्षांपासून ही पात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नुकताच या शोने 14 वर्षांचा प्रवास पूर्ण करून संपूर्ण टीमने केक कापून आनंद साजरा केला. प्रेक्षकांनीही संपूर्ण टीमला इतक्या वर्ष मनोरंजन करत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.