मुंबई, 18 नोव्हेंबर : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' कायमच चर्चेत असतो. मालिकेतील कलाकारही घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. प्रत्येक पात्राला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळत असतं. तारक मेहताच्या सेटवरील प्रत्येक बातमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असते. अशातच तारक मेहताच्या सेटवरुन एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. तारक मेहता का उल्टा चष्माचे 'चंपक चाचा' म्हणजेच अभिनेता अमित भट्टला सेटवर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.
ETimes TV च्या वृत्तानुसार, अभिनेता अमित भट्टला तारक मेहता का उल्टा चष्मा मधील एका सीनसाठी पळावे लागले होते, पण धावताना त्याचा तोल गेला आणि तो पडला. पडल्यामुळे अभिनेत्याला दुखापत झाली. त्याला आता शूटिंगमधून ब्रेक देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अभिनेता अमित भट्टच्या दुखापतीमुळे चाहते आणि शोमधील सदस्य चिंतेत आहेत. तो लवकरच बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
View this post on Instagram
अमित भट्ट उर्फ चंपक चाचा हे या शोमधील सर्वात प्रिय पात्रांपैकी एक आहे आणि त्याचे ऑन-स्क्रीन जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्याशी असलेले त्यांचे बाँडिंग सर्वांना आवडते. अमित भट्ट खऱ्या आयुष्यात त्याचा ऑन-स्क्रीन मुलगा दिलीप जोशी यांच्यापेक्षा लहान असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. चंपक चाचाच्या डायलॉगवर अनेक मीम्सही व्हायरल होत असतात.
दरम्यान, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणारा शो बनला आहे. जेठालालपासून चंपक लाल आणि दयाबेनपर्यंत प्रत्येक पात्र चाहत्यांना खूप आवडते. शोमधील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. प्रत्येक पात्राची एक वेगळी विशेषता असून गेल्या अनेक वर्षांपासून ही पात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नुकताच या शोने 14 वर्षांचा प्रवास पूर्ण करून संपूर्ण टीमने केक कापून आनंद साजरा केला. प्रेक्षकांनीही संपूर्ण टीमला इतक्या वर्ष मनोरंजन करत असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.