Taarak Mehta ka oolta chashma : मुलीनेही दिला होकार; तुम्हाला काय वाटतं आता तरी पोपटलालचं लग्न होणार?

Taarak Mehta ka oolta chashma : मुलीनेही दिला होकार; तुम्हाला काय वाटतं आता तरी पोपटलालचं लग्न होणार?

Taarak mehta ka oolta chashma : इतकी वर्षे लग्नाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पोपटलालला (Popatlal marriage) यावेळी मुलीनेच स्वत:हून होकार दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (Taarak Mehta ka oolta chashma)  सध्या विविध कारणांसाठी चर्चेत आहे. पण आता सब टिव्हीवरील (sab tv)  मालिकेतून एक वेगळी बातमी समोर येत आहे. इतकी वर्षे लग्नाची आतुरतेने वाट पाहणारा पोपटलाल (Popatlal marriage) अखेर लग्नबेडीत अडकत आहे. एका मुलीने त्याला स्वत:हून होकार दिला आहे. त्यामुळे गोकुळधाममध्ये पुन्हा एकदा पोपटलालच्या लग्नाची धामधून सुरू झाली आहे.

आजवर पोपटलालचं अनेकदा लग्न ठरलं होतं. पण काहीना काही कारणाने ते लग्न मोडलं जात होतं. गेली 12 वर्षे पोपटलाल लग्नाची स्वप्नं रंगवत आहे. पण त्याचं लग्न काही ठरत नव्हतं आणि ठरलं तरीही ऐनवेळी मोडलं जायचं. अखेर आता एका मुलीने पोपटलालला लग्नासाठी होकार दिला आहे.

मागील भागात पोपटलालची एका पूजा नावाच्या मुलीशी भेट झाली होती. तर ही मुलगी फक्त पोपटलालला भेटण्यासाठी मुंबईला आली आहे. त्यामुळे आता पोपटलालच्या आनंदाला पारा उरला नाही.

हे वाचा - अखेर श्रीधरचा खेळ संपला; ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिकेचा असा होणार शेवट

गोकुळधामचे सगळे सदस्य पोपटलालच्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत. पोपटलालचं लग्न ठरत असलं तरीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती म्हणजे हे लग्न खरंच पार पडणार की नेहमीप्रमाणे या ही वेळेस काहीतरी विघ्न येणार. कारण अनेकदा पोपटलालचं लग्न ऐन मांडवातही फिसकटलं होतं. तेव्हा आता तरी ते पूर्ण होणार का पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

वाचा - विवेक ओबेरॉयवर आली होती झोपडपट्टीत राहण्याची वेळ; सांगितला तो धक्कादायक अनुभव

तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेट वरून रोज नवनवीन बातम्या समोर येत आहे. तर आता सेटवरील काही कलाकारांना कोरोनाची लागन झाल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. यामध्ये गोकुळधाम मधील भिडे मास्तर, गोली आणि अन्य दोन कलाकारांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.

Published by: News Digital
First published: April 17, 2021, 7:59 PM IST

ताज्या बातम्या