Home /News /entertainment /

विवेक ओबेरॉयवर आली होती झोपडपट्टीत राहण्याची वेळ; सांगितला तो धक्कादायक अनुभव

विवेक ओबेरॉयवर आली होती झोपडपट्टीत राहण्याची वेळ; सांगितला तो धक्कादायक अनुभव

विवेक हा एक स्टारकिड असूनही त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. एकदा तर विवेकने चक्क तीन आठवडे झोपडपट्टीत घालवले होते. स्वत: विवेकनेच या गोष्टीचा खुलासा एका मुलाखतीत केला होता.

  मुंबई, 17 एप्रिल : अभिनेता विवेक ऑबेरॉय (Vivek Oberoi) बॉलिवूडचा सर्वाधिक अंडररेटेड अभिनेता (underrated actor)  मानला जातो. चांगल काम करुनही पुरेशी प्रसिद्धी मिळाली  नसल्याचं नेहमीच बोललं जातं. तर विवेक हा एक स्टारकिड असूनही त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. एकदा तर विवेकने चक्क तीन आठवडे झोपडपट्टीत घालवले होते. स्वत: विवेकनेच या गोष्टीचा खुलासा एका मुलाखतीत केला होता. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Verma) यांचा 2002 साली ‘कंपनी’ (Company)  हा एका गँगस्टरवर आधारीत चित्रपट आला होता. चित्रपट हिट देखिल ठरला होता. तर अभिनेता विवेक ऑबेरॉयने यात मुख्य भूमिका साकारली होती. सध्या बॉलिवूड मध्ये नेपोटिझम (Nepotism)  चालत असल्याच्या चर्चा असल्या तरीही विवेक एक स्टारकिड असूनही राम गोपाल वर्मा यांनी विवेकला नकार दिला होता. तेव्हा विवेकने स्वत:ला सिद्ध करुन दाखवण्याचा निर्णय घेतला होता. नुकतेच विवेक ने फिल्म इंड्स्ट्रीत त्याला 19 वर्षे पूर्ण झाल्याचं सांगितलं होत. तर कंपनी या चित्रपटातून त्याने बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होतं. एका वृत्तपत्राला  दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याला या चित्रपचासाठी तब्बल तीन आठवडे झोपडपट्टीत रहावं लागलं असल्याचं त्याने म्हटलं आहे. “कंपनी हे माझ्यासाठी स्वप्नवत पदार्पण होतं. हा खूप वेगळा डेब्यू होता. राम गेपाल वर्मा यांनी मला ही संधी दिली आणि मी त्या पात्रात पोहोचू शकलो, मी एक खोली भाड्याने घेतली होती, आणि त्या झोपडपटटीत मी तीन आठवडे राहीलो व चंदू नागरे या पात्रात स्वताला रुपांतरीत केलं. आता 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण काहीच बदललं नाही, मी या संधीसाठी फार कृतज्ञ आहे आणि हे स्वप्न सत्यात उतरलं.” विवेक म्हणाला.

  आजोबा BIG B यांचा तो फोटो पाहून भारावली नात नव्या; सोशल मीडियावर झाली व्यक्त

  चित्रपटातील चंदू हे एक झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाचं पात्र होतं. आणि त्यासाठी विवेकने स्वता झोपडपट्टीत राहून त्या व्यक्तिरेखेवर काम केलं होतं. आणि त्यानंतरच राम गोपाल वर्मा यांनी विवेकला चित्रपचात घेतलं होतं. तर चित्रपट प्रचंड हिट देखिल ठरला होता. विवेक त्याच्या आगामी चित्रपटात व्यस्त आहे. अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari)  मुलगी पलक (Palak) हीच्या सोबत विवेक दिसणार आहे. ‘रोझी’ (Rossie : the saffron chapter)  असं चित्रपटाचं नाव असून लवकच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood News, Vivek oberoi

  पुढील बातम्या