अखेर श्रीधरचा खेळ संपला; ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिकेचा असा होणार शेवट

अखेर श्रीधरचा खेळ संपला; ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिकेचा असा होणार शेवट

मालिकेत श्रीधरने स्वाती इतकचं प्रेक्षकांनाही खेळवून ठेवलं होत. प्रत्येकवेळी त्याच नवं कारस्थान समोर यायचं. शनिवारी मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होत आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : अनेक माहिने प्रेक्षकांची उत्सुकता खेळवून ठेवणारी लोकप्रिय मालिका ‘चंद्र आहे साक्षीला’ (Chandra ahe sakshila)  आता प्रेश्रकांचा निरोप घेत आहे. कलर्स मराठी (Colors Marathi)  वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका आता अखेरच्या टप्प्यात असून शनिवारी मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होत आहे. मालिकेतील श्रीधरने स्वाती इतकचं प्रेक्षकांनाही खेळवून ठेवलं होत. प्रत्येकवेळी त्याच नवं कारस्थान समोर यायचं. आणि त्यामुळे स्वातीच्या आयुष्यात अनेक अडथळे निर्माण झाले होते.

संग्रामने स्वातीला घराबाहेर काढलं होतं. तर दुसरीकडे श्रीधरचा प्लॅन यशस्वी होत होता. पण अचानक सुमनला श्रीधरबद्दल एक सत्य समजतं आणि ती श्रीधकला सोडून जाते. तेव्हा श्रीधर तीला शोधत टेंभे वाड्यात जातो पण सुमन तिथे नसते व घरातही फक्त स्वातीच असते. श्रीधर तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो पण स्वाती यावेळी मात्र त्याला दाद देत नसते. तर दुसरीकडे जगतापांच्या घऱी उर्मिला प्रियाची पोलखोल करते. व हे सगळं प्रियानेच घडवून आणलं असल्याचं संग्राम ला सांगते.

‘मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात भीक मागावी लागते’; प्रसाद ओक संतापला

पण यामध्ये शेवटच्या भागात मोठा ट्विस्ट येत आहे.  प्रत्यक्षात संग्रामला सगळं काही माहीत असतं. व त्यानेच हा सगळा प्लॅन केलेला असतो. श्रीधर टेंभे वाड्यात आला असता संग्राम तिथे पोहोचतो. व त्याची सगळी पोलखोल करतो. व मूल मिळवण्यासाठी इतके खटाटोप करण्यापेक्षा अनाथ मुलाला दत्तक घ्या असा सल्ला तो श्रीधरला देतो व त्यानंतर श्रीधर तेथून निधून जातो.

घरी परतल्यानंतर सुमन घरी येते व हा सगळा गैरसमज संग्रामने पसरवला होता म्हणत ती श्रीधरची माफी मागते. तर तिकडे स्वाती देखिल आता पुन्हा एकदा जगतापांच्या घरी परतते व आता स्वाती- संग्रामचा सुखाचा संसार सुरु होत आहे. व श्रीधरनेही आता मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीतच नेहमीप्रमाणे मालिकेचा गोड शेवट झाला आहे. व श्रीधरच्या विकृत मानसिकतेचा पराभव.

मालिकेत अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave), आस्ताद काळे (Aastaad kale) व ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) असे अनुभवी कलाकार काम करत होते. शिवाय मालिकेला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद देखिल मिळाला होता. ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकावर मालिका आधारित असल्याचं म्हटलं जात होतं. पण नाटकापेक्षा मालिकेच्या कथेत अनेक बदल करण्यात आले होते. व संपूर्ण वेगळी कथा छोट्या पडद्यावर मांडण्यात आली होती.

Published by: News Digital
First published: April 17, 2021, 5:21 PM IST

ताज्या बातम्या