मुंबई, 16 जुलै- बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू इतर अभिनेत्रींप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असते. एवढंच नाही तर ती अनेकदा सामाजिक मुद्द्यांवर आपली मतंही मांडताना दिसते. नुकतेच तिने नागपुरमध्ये प्रेयसीच्या केलेल्या हत्येवर तिने एक ट्वीट केलं. नेमकी याच कारणामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. पण तिने हे ट्वीट उपहासात्मक पद्धतीने केलं होतं असं नंतर स्पष्टीकरण दिलं होतं. एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर तिने दुसरं ट्वीट करत म्हटलं की, ‘ज्या लोकांना उपहासात्मक भाषा कळत नाही त्यांनी कृपया माझ्या या ट्वीटकडे लक्ष देऊ नका.’ नेमकं असं काय झालं की तापसीला लोकांनी ट्रोल केलं ते संपूर्ण प्रकरण जाणून घेऊ.
Statutory warning: people with no sense of sarcasm kindly ignore me n my tweet. Thank you , it was nice not knowing you 🙏🏼 https://t.co/OhIeOd6ZYf
— taapsee pannu (@taapsee) July 15, 2019
त्याचं झालं असं की, सोमवारी नागपूरमध्ये एका प्रियकराने 19 वर्षीय प्रेयसीची हत्या केली. तिच्या चारित्र्यावर संशय आल्यामुळे त्याने तिची हत्या केली. हीच बातमी तापसीने रीट्वीट करत म्हटलं की, ‘काय माहीत कदाचित दोघं एकमेकांवर अतोनात प्रेम करत असतील आणि असं करणं हे त्यांचं खरं प्रेम मान्य करण्यासारखं असेल.’
You must be deranged to take a dig at Kabir Singh while reacting to a real murder .
— Karuna Gopal Vartakavi (@KarunaGopal1) July 16, 2019
Sasti copy 😂😂 with Sasta tweet
— Rashi Arora (@MuskanC09890967) July 15, 2019
असं म्हटलं जातं की, तापसीने हे ट्वीट कबीर सिंगचे दिग्दर्शक संदीप वांगाला उद्देशून केलं होतं. याआधी संदीपने ते प्रेम असूच शकत नाही जिकडे कानशिलात मारण्याचं स्वातंत्र्य नसतं, असं अजब वक्तव्य केलं होतं. संदीपच्या या ट्वीटनंतर त्याला सोशल मीडियावर सर्वांनीच खडेबोल सुनावले होते. आता तापसीनेही तिच्या ट्वीटमध्ये संदीपवर निशाणा साधला. पण नेटकऱ्यांना तापसीची ही गोष्टही पटली नाही, त्यांनी तापसीला सुनवलं.
लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया पाहून तापसीने दुसरं ट्वीट करत म्हटलं की, ‘चेतावणी- ज्या लोकांना माझं हे उपहासात्मक (sarcasm) बोलणं कळलं नसेल त्यांनी कृपया माझ्या ट्वीटकडे दुर्लक्ष करा.’ एकीकडे लोक आपला राग व्यक्त करत होते तर अनेकांनी तिच्या या टवीटचं समर्थनही केलं. ‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा मालामाल, जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये या अभिनेत्रीच्या भावानं केलं टीव्ही अॅक्ट्रेसशी लग्न; शेअर केले बोल्ड फोटो सनी लिओनीच्या घरी पुन्हा हलणार पाळणा? नवऱ्यासोबत फोटो केला शेअर …म्हणून अक्षय कुमारचा मुलगा क्रिकेटचा द्वेष करतो कोंबडा भिडला सापाला, VIDEO व्हायरल

)







