
बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिवर्स सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनने टीव्ही अभिनेत्री चारू असोपाशी नुकतंच राजेशाही थाटात डेस्टिनेशन वेडिंग केलं.

लग्नानंतर दोघंही हनीमुनला थायलंडला गेले होते. तिथले अनेक फोटो राजीव आणि चारूने सोशल मीडियावर शेअर केले.

इन्स्टाग्रामवर दोघांनी साखरपुडा, संगीत हळद, लग्न, रिसेप्शन, हनीमून असे प्रत्येक कार्यक्रमाचे अनेक फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले.

या सर्व फोटोंमध्ये चारू आणि राजीव फार आनंदी दिसत असून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत.

इन्स्टाग्राम स्टोरीज आणि इतर माध्यमांद्वारे राजीव आणि चारू एकमेकांसाठीचं प्रेम सतत शेअर करतच असतात.

दोघांच्याही इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नजर टाकली तर राजीव आणि चारूने त्यांच्या लग्नातील प्रत्येकक्षण फोटोंच्या माध्यमातून कायमस्वरूपी जपून ठेवला आहे.




