जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा झाला मालामाल, एका जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये

‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा झाला मालामाल, एका जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये

‘पीछे देखो पीछे’ बोलणारा पाकिस्तानी मुलगा झाला मालामाल, एका जाहिरातीसाठी घेतो इतके रुपये

त्याचा कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला तर अवघ्या काही मिनिटांत तो व्हायरलही होतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जुलै- गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर एका पठाणी मुलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्याला पाहिल्यावरच कोणीही त्याच्या प्रेमात पडेल असं त्या मुलाचा आवाज आणि देहबोली आहे. त्याचा कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला तर अवघ्या काही मिनिटांत तो व्हायरलही होतो. अशा या सुपर क्यूट मुलाचं नाव आहे अहमद शहा. तो पाकिस्तानचा राहणारा आहे. संपूर्ण जगाला ‘पीछे तो देखो’ म्हणत स्वतःच्या प्रेमात पाडणाऱ्या अहमदला या व्हिडिओमुळे कमालिची प्रसिद्धी मिळाली. फक्त पाकिस्तानातच नाही तर जगभरात अहमदचे चाहते तयार झाले. त्याची प्रसिद्धी पाहून अनेक ब्रॅण्ड त्याच्याकडे जाहिरातींसाठी जात आहेत. आता तर त्याच्याकडे एक दोन नाही तर अनेक जाहिरातींसाठी विचारणा झाली आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी अहमद मालामाल झाला आहे. नुकतंच अहमदने तेलाच्या एका ब्रॅण्डसाठी जाहिरात केली. याशिवाय त्याने फ्रूट ड्रिंकसाठीही जाहिरात केली. अहमदचा हा अनोखा अंदाज फक्त पाकिस्तानातच नाही तर भारत आणि आसपासच्या देशांमध्ये पसंत केला जात आहे. विशेष म्हणजे अहमद फक्त चार वर्षांचा आहे. अहमदच्या बोलण्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो गप्पा मारण्यात पटाईत आहे. यामुळेच तो सोशल मीडियाचा लाडका मुलगा झाला आहे. पाकिस्तानमध्ये त्याची लोकप्रियता एवढी आहे की, गुड मॉर्निंग पाकिस्तान या टीव्ही शोमध्येही तो दिसतो.

जाहिरात

गेल्याच महिन्यात अहमदची प्रसिद्धी पाहून एका दुधाच्या कंपनीने त्याला ब्रॅड अँबेसिडर केले आहे. ही कंपनी गायीचं दूध विकते. या कंपनीसाठी अहमद जाहिराती करताना दिसतो. अहमद एवढा मोठा स्टार झाला आहे की, मोठ मोठ्या टीव्ही शोमध्ये त्याला बोलावण्यात येतं आणि त्याच्यावर लाखो- कोटी रुपये खर्च केले जातात. या अभिनेत्रीच्या भावानं केलं टीव्ही अॅक्ट्रेसशी लग्न; शेअर केले बोल्ड फोटो सनी लिओनीच्या घरी पुन्हा हलणार पाळणा? नवऱ्यासोबत फोटो केला शेअर …म्हणून अक्षय कुमारचा मुलगा क्रिकेटचा द्वेष करतो कोंबडा भिडला सापाला, VIDEO व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात