#MeToo संबंधित प्रश्नावर तापसी पन्नूचा चढला पारा, महिला पत्रकाराचा केला अपमान

#MeToo संबंधित प्रश्नावर तापसी पन्नूचा चढला पारा, महिला पत्रकाराचा केला अपमान

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर कोणत्याही प्रश्नाचं विस्तारानं उत्तर देणारी तापसी आजकाल कोणत्याही प्रश्नानंतर पत्रकारांवर चिडताना दिसते.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : रनिंग शादी, दिल जंगली, मनमर्जिया, नाम शबाना आणि गेम ओव्हर सारखे फ्लॉप सिनेमा देणारी अभिनेत्री तापसी पन्नूचे नखरे मात्र आजकाल सातव्या आसमानावर आहेत. मागच्या काही दिवसांपासून तापसीचं वागणं खूप बदललं असून ती सर्वांशी प्रचंड उद्धटपणे वागताना दिसून येत आहे. मग तिची टीम असो वा प्रमोशन दरम्यान मुलाखत घेण्यासाठी आलेले पत्रकार असो. तापसी सर्वांनांच अपमानास्पद वागणूक देताना दिसत आहे.

सध्या तापसी 'सांड की आँख' या तिचा आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. पण नुकतंच या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान पत्रकार आणि टीमसोबत तापसीचे नखरे पाहायला मिळाले. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर कोणत्याही प्रश्नाचं विस्तारानं उत्तर देणारी तापसी यावेळी कोणत्याही प्रश्नानंतर पत्रकारांवर चिडताना दिसली. आजकाल तापसीचं वागणं बदललं असून पत्रकारांचा प्रत्येक प्रश्न हसण्यावरी घेत सर्वांसमोर त्यांचा अपमान करण्याचा प्रकार तिच्याकडून वारंवार घडत आहे.

वयाच्या 65व्या वर्षी रेखा यांचं सौंदर्य कायम, काय आहे त्यांचं ब्युटी सिक्रेट

Loading...

 

View this post on Instagram

 

And these 2 cuties .... 😍😍😍 Blessing to have them around us while we embark on this tiring nonstop journey of last 2 weeks before our big release 👭 #SaandKiAankh this Diwali !

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर एखादा पत्रकार तापसीच्या हिशोबानं म्हणजे तिला आवडतील असे प्रश्न विचारत नसेल तर ती त्याच्यावर चिडते आणि पत्रकाराचा अपमान करुन त्याचा चार शब्द सुनावते. विशेष म्हणजे, तिचा आगामी सिनेमा सांड की आँख अशा दोन वृद्ध महिलांची कथा आहे. ज्या जगभरातील महिलांसाठी प्रेरणास्थान ठरल्या. अशात महिला सशक्तीकरणा बद्दल #MeToo मोहिमेशी संबंधित एक प्रश्न विचारल्यानंतर तापसीनं हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.

दीपज्योतीनं 50 लाखांच्या प्रश्नावर सोडला KBC, 'मन की बात' ऐकून जिंकले 25 लाख

 

View this post on Instagram

 

Looking at all the love coming our way be like... #GearingUp #SaandKiAankh This Diwali !

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

तापसीला एखाद्या पत्रकाराचा प्रश्न सुरक्षित वाटत नसेल तर ती मुलाखती दरम्यानच पत्रकारावर चिडते. सुत्रांच्या माहितीनुसार एका महिला पत्रकारानं 'मी टू' चळवळीबद्दल प्रश्न विचारल्यावर तापसी तिच्यावर चिडली आणि नंतर पत्रकारांनी काय प्रश्न विचारावेत आणि काय विचारू नये याविषयी त्यांना सांगू लागीली. एवढ्यावरच ती थांबली नाही तर हा प्रश्न किती लहान आहे हे सांगत तिनं त्या पत्रकाराची खिल्ली उडवली. तर दुसरीकडे तिच्यासोबत असलेल्या भूमि पेडणेकरनं मात्र शांतपणे आपलं मत मांडलं.

सायना नेहवालच्या बायोपिकसाठी परिणिती तयार, या दिवशी होणार शुटिंगला सुरुवात

तापसीचं असं वागणं फक्त पत्रकारांपूरतच मर्यादित नाही तर ती तिच्या पीआर टीमसोबतही अशाच प्रकारे उद्धटपणे वागताना दिसली. ती तिच्या टीमला धमक्या देत होती. तिचं हे वागणं खरंच सर्वांना दुखावणारं होतं. तिचं अशाप्रकारचं वागणं पाहिल्यावर ती आतापर्यंत महिला सशक्तिकरणाबाबत जे काही बोलली ते सर्व फक्त दिखावा होता असं सर्वांना वाटू लागलं आहे. कारण जर तिला याबद्दल खरंच काही वाटत असतं तर तिनं महिला पत्रकाराची खिल्ली उडवून तिचा अपमान केला नसता.

======================================================

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2019 01:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...