मुंबई, 10 ऑक्टोबर : कौन बनेगा करोडपतीच्या 9 ऑक्टोबरला झालेल्या एपिसोडमध्ये झारखंडच्या दीपज्योतीनं 25 लाखाची रक्कम जिंकली. झारखंडच्या मेहंदीनगर येथे राहणाऱ्या दीपज्योतीनं 8 ऑक्टोबरच्या शोमध्येच सर्व लाइफलाइन वापरल्या होत्या. चार लाइफलाइन वापरुन तिनं 12.50 लाख रुपये जिंकले होते. 25 लाखांसाठी दीपज्योतीला विचारण्यात आलेला प्रश्न प्रश्न : खालीलपैकी कोणी इलेक्ट्रॉनिक डायरीचा शोध लावला. जे पहिल्या इलेक्ट्रॉनिक हॅन्डहेल्ड उपरकरणापैकी एक आहे? उत्तर : सॅम पित्रोदा हा प्रश्न विचारण्याआधी दीपज्योतीनं तिच्या सर्व लाइफलाइनचा वापर केला होता आणि त्यातही गंमतीशीर गोष्ट अशी की तिला या प्रश्नाचं उत्तरही माहित नव्हतं. त्यावर तिनं ठरवलं की ती स्वतःच्या मनाचा कौल घेऊन पुढे जाईल कारण या आधीही तिनं आपल्या मनाचं ऐकलं होतं आणि या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली होती. सायना नेहवालच्या बायोपिकसाठी परिणिती तयार, या दिवशी होणार शुटिंगला सुरुवात
50 लाखांसाठी होता हा प्रश्न प्रश्न : जमशेदजी नुसीरवानजी टाटा यांनी स्थापन केलेली भारतीय विज्ञान संस्था बंगळुरूचे पहिले भारतीय डायरेक्टर कोण होते? उत्तर : सीव्ही रमन या प्रश्नावर दीपज्योतीन खेळ सोडला. ती सतीश धवन या पर्यायाचा विचार करत होती. जर तिनं चुकीचं उत्तर दिलं असतं तर तिला फक्त 3.20 लाख रुपये एवढीच रक्कम मिळाली असती. झिवानं रणवीर सिंहवर केला चोरीचा आरोप, धोनीनं दिलं स्पष्टीकरण आईसाठी घर घेण्याची दीपज्योतीची इच्छा दीपज्योती आता फक्त 19 वर्षांची आहे. ती स्वतः कमाई करुन घर चालवते आणि यासोबतच ती तिचं शिक्षण सुद्धा पूर्ण करते. पुढे जाऊन तिला B.Sci चं शिक्षण घ्यायचं आहे. मात्र त्यासाठी ती मुलांना अबॅकस शिकवते. या नोकरीतून तिला महिना 9000 रुपये पगार मिळतो. यातून ती तिचं घर चालवते आणि शिक्षण सुद्धा घेते. केबीसीमधून जिंकलेल्या पैशातून आपल्या आईसाठी घेण्याची दीपज्योतीची इच्छा आहे.
Deepjyoti brings a special gift for Mr. Bachchan - an abacus, and even shows him how to use the device for some quick calculations! Watch #KBC11, tonight at 9 PM. @SrBachchan pic.twitter.com/Tbep20MLbA
— sonytv (@SonyTV) October 9, 2019
दीपज्योतीला तिच्या घरी डीजे नावानं हाक मारतात. अमिताभ यांनी तिला विचारलं की, तू डीजे सारखं हात गोल फिरवून डीजे वाजवतेस का? यावर दीपज्योती म्हणाली, सध्या तरी नाही पण मला तशी संधी मिळाली तर मी नक्की असं करेन. याशिवाय तिनं अमिताभ यांना या शोमध्ये अबॅकस शिकवलं ज्यात जोड-घटना खूप सोप्या पद्धतीनं करता येते. KBC मध्ये विचारला मोदी सरकारशी संबंधित प्रश्न, तुम्हाला माहित आहे का याचं उत्तर? अमिताभ यांना या गोष्टीसाठी मिळाला होता वडीलांचा मार या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी त्याच्या बालपणीची एक आठवण सांगितली. ते म्हणाले, लहान असताना पाढे पाठ करावे लागत असत. जेव्हा ते शाळेत किंवा आईसमोर म्हणावे लागत तोपर्यंत ठिक होतं मात्र जेव्हा वडील हरिवंशराय बच्चन जेव्हा पाढे म्हणून घेत असत त्यावेळी चुकल्यावर डोक्यावर एक टप्पू पडत असे. ================================================================== VIDEO: ‘राजीनामा द्यायला जिगर लागतं’; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार