All Set! सायना नेहवाल बायोपिकसाठी परिणिती तयार, या दिवशी होणार शुटिंगला सुरुवात

All Set! सायना नेहवाल बायोपिकसाठी परिणिती तयार, या दिवशी होणार शुटिंगला सुरुवात

सायना नेहवालच्या बायोपिकसाठी परिणितीन प्रचंड मेहनत घेतली असून ती आता या सिनेमाच्या शूटिंगसाठी पूर्णपणे तयार झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 09 ऑक्टोबर : सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. विशेषतः खेळाडूंच्या जीवनावर आधारित बायोपिकना प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती मिळत आहे. आतापर्यंत, एम एस धोनी, सचिन तेंडुलकर, मेरी कोम, मिल्खा सिंग इत्यादी खेळडूंच्या जीवनावर सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आता त्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकची भर पडणार आहे. सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये तिची भूमिका अभिनेत्री परिणिती चोप्रा साकारत आहे.

सायना नेहवालच्या या बायोपिकसाठी सुरुवातील श्रद्धा कपूरची निवड करण्यात आली होती. तिच्या बीझी शेड्युलमुळे तिनं हा सिनेमा सोडला आणि मग या सिनेमासाठी परिणितीची वर्णी लागली. मागच्या काही दिवसांपासून परिणिती या सिनेमासाठी बॅडमिंटनचं ट्रेनिंग घेतलं आहे. परिणितीच्या अथक परिश्रमांनंतर आता या सिनेमाच्या शूटिंगची पूर्ण तयारी झाली असून लवकरच परिणिती या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. याची माहिती तिनं सोशल मीडिया अकाउंवर एक फोटो पोस्ट करुन दिली.

झिवानं रणवीर सिंहवर केला चोरीचा आरोप, धोनीनं दिलं स्पष्टीकरण

 

View this post on Instagram

 

Getting there ... shoot begins SOOOON! #SainaNehwalBiopic

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

काही दिवासांपूर्वीच सायना नेहवालनं परिणितीचा फर्स्ट लुक शेअर करत तिला या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. परिणितीनं आपण ऑक्टोबरमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं होतं.

या सिनेमाविषयी बोलताना परिणिती म्हणाली, मी या सिनेमासाठी पूर्ण मेहनत घेतली आहे. या सिनेमात मी असं काही करत आहे जे मी मागच्या 10-12 वर्षांत कधीच केलं नव्हतं. या सिनेमाच्या प्रोसेसनं मला बरंच काही शिकवलं. यामुळे मला मी व्यक्ती म्हणून काय आहे हे मला समजलं. या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. माझ्यासाठी हे खूपच आव्हानात्मक होतं. पण या अनुभवानं माझं आयुष्य बदलून टाकलं.

VIDEO : रणवीर सिंहला सर्वांसमोर ओरडली अनुष्का शर्मा, चाहते का देतायत शाबासकी

सायना नेहवालच्या या बायोपिकची निर्मिती भूषण कुमार आणि अमोल गुप्ते करत आहेत. काही दिवसांपूर्वीच परिणितीनं द गर्ल ऑन द ट्रेन या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. हा हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन रिभू दासगुप्ता यांनी केलं असून या सिनेमात किर्ती कुल्हारी एका ब्रिटीश पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉलिवूडमध्ये येण्याआधी मासे विकायची ट्विंकल खन्ना? वाचा काय आहे सत्य

=========================================================================

आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO

Published by: Megha Jethe
First published: October 9, 2019, 5:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading