मुंबई**, 25** जुलै: मीराबाई चानू हिने टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावलं आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं मेडल आहे. लक्षवेधी बाब म्हणजे वेटलिफ्टिंग या खेळात तब्बल दोन दशकानंतर भारताला ऑलिम्पिक मेडल मिळालं आहे. त्यामुळे मिराबाईवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने देखील मीराबाईवर स्तुतीसुमनं उधळली. विजय साजरा करण्यासाठी तापसी एक भलामोठा पिज्जा मीराबाईला भेट म्हणून देणार आहे. ‘लिपस्टिकमुळे माझी लायकी काढली’; या मराठी अभिनेत्रीवर करण्यात आला चोरीचा आरोप तापसीनं एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मीराबाईच्या विजयावर आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, “भारतासाठी ही आनंदाची बाब आहे. माझ्याकडून तिला भरपूर शुभेच्छा. हेल्दी डाएटमुळे गेली बरीच वर्ष तिने पिज्जा खाल्लेला नाही. त्यामुळे भारतात परतताच मी तिला एक भलामोठा पिज्जा भेट म्हणून देणार आहे.” ‘अशी चूक पुन्हा होणार नाही’; सलमान खाननं मागितली आथिया शेट्टीची माफी
भारताच्या या सिल्व्हर गर्लची प्रतिक्रिया ऐकताच तिला आयुष्यभर फ्री पिझ्झा देण्याची घोषणा डॉमिनोझ कंपनीनं (Domino’s India) केली आहे. मीराबाईला यापुढेही कधीही पिझ्झासाठी प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं कंपनीनं ट्विटरवर जाहीर केलं. ऑलिम्पिक मेडल जिंकणे हे माझे लक्ष्य होते. यासाठी आपण कठोर कष्ट केले आहेत. या मेडलमुळे देशातील अनेक वेटलिफ्टर्सना प्रेरणा मिळेल, अशी आशा मीराबाईनं व्यक्त केली आहे.