मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘लिपस्टिकमुळे माझी लायकी काढली’; या मराठी अभिनेत्रीवर करण्यात आला चोरीचा आरोप

‘लिपस्टिकमुळे माझी लायकी काढली’; या मराठी अभिनेत्रीवर करण्यात आला चोरीचा आरोप

हिंदी मालिकेच्या सेटवर मराठी अभिनेत्रीचा अपमान; थेट करण्यात आला चोरीचा आरोप

हिंदी मालिकेच्या सेटवर मराठी अभिनेत्रीचा अपमान; थेट करण्यात आला चोरीचा आरोप

हिंदी मालिकेच्या सेटवर मराठी अभिनेत्रीचा अपमान; थेट करण्यात आला चोरीचा आरोप

मुंबई 25 जुलै: दुहेरी (Duheri) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री उर्मिला निंबाळकर (Urmila Nimbalkar) मराठी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. व्हिडीओ आणि ऑनलाईन पोस्टच्या माध्यमातून ती विविध प्रकारचे किस्से शेअर करत असते. यावेळी तिने आपल्या करिअरमधील एक चकित करणारा अनुभव शेअर केला आहे. एकदा तिच्यावर चक्क लिपस्टिक चोरीचा आरोप करण्यात आला होता. अन् हा धक्कादायक प्रकार एका मालिकेच्या सेटवर घडला होता.

उर्मिलाला एका लिपस्टिक कंपनीच्या जाहिरातीची ऑफर मिळाली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे करिअरच्या सुरुवातीस याच कंपनीच्या लिपस्टिक चोरीचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. हा धक्कादायक अनुभव उर्मिलानं एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सांगितला आहे. तर मग पाहूया काय म्हणाली अभिनेत्री?...

‘अशी चूक पुन्हा होणार नाही’; सलमान खाननं मागितली आथिया शेट्टीची माफी

"तर झालं असं..

एका मोठ्या हिंदी मालिकेच्या सेटवर,

त्या मालिकेतील हिरोईनची मेकअप आणि हेअर ड्रायर ची बॅग चोरीला गेली. त्याचवेळेस पैसे साठवून मी @maccosmeticsindia ची एक लिपस्टिक विकत घेतली होती. तेवढी एकच लिपस्टिक अप्रतिम क्वालिटीची, ब्रॅंडेड आणि माझा ओठांना रॅश न येऊ देणारी असल्यामुळे मी प्रत्तेकच शुटिंगमधे ती वापरायचे. मराठी कलाकाराच्या पर डे पेक्षा मोठ्या किंमतीची लिपस्टिक माझ्या हातात दिसल्याने, माझ्यावर चोरीचा पहिला संशय घेण्यात आला. या प्रकरणात माझा काहीही संबंध नसल्याने, साहजिकच त्यांना मी माझी संपुर्ण बॅग चेक करु दिली. माझा मोठा भाऊ भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी म्हणून निवडला गेलेला असून, माझे वडिल व्याख्यान आणि प्रवचने करतात. माझ्या कुटुंबातील प्रत्तेक पुरुष पिढ्यांपिढ्या शेती करतोय. कलेचा कसलाही वारसा नसलेल्या कुटुंबातील मी पहिलीच मुलगी आहे, जी एकटी २ बस आणि २ लोकल बदलून, मुंबईत प्रामाणिकपणे ॲाडिशन पास करुन, सेटवरील एकमेव मराठी कलाकार असूनही वेगळ्या भाषेत काम करतीय. बेंबीच्या देठापासून ओरडून मला त्यांना सांगायचं होतं की मी चोर नाही. त्या माझ्या सर्वात आवडत्या एकमेव लिपस्टिकमुळे माझी डायरेक्ट लायकी काढण्यात आली होती. इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं मला.

बिग बॉस फेम अभिनेत्रीचा भीषण कार अपघात; घटनेत मैत्रीणीचा जागीच मृत्यू

परवा @maccosmeticsindia चा मला मेल आला, आम्हाला तुमच्या मराठी युट्यूब चॅनेलवर आमचं नविन प्रॅाडक्ट पहिल्यांदा लॅांच करायचंय आणि आम्ही तुमच्या प्रामाणिक प्रतिक्रेयेचे तुम्हाला पैसे देऊ! तुम्ही तुमच्या गोड मराठी भाषेतच बोला हा त्यांचा आग्रह होता. आपल्या आवडत्या ब्रॅंडबरोबर काम करुन पैसे मिळवण्याचा आनंद आहेच पण माझा हा प्रवास मलाच आनंदाचा अभिमानाचा वाटतो!"

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi actress, Social media, YouTube Channel