मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘अशी चूक पुन्हा होणार नाही’; सलमान खाननं मागितली आथिया शेट्टीची माफी

‘अशी चूक पुन्हा होणार नाही’; सलमान खाननं मागितली आथिया शेट्टीची माफी

सलमान खानला सुनिल शेट्टीची लेक अभिनेत्री आथिया शेट्टीची (Athiya Shetty) माफी मागावी लागली. पाहूया काय होतं त्यामागचं खरं कारण?

सलमान खानला सुनिल शेट्टीची लेक अभिनेत्री आथिया शेट्टीची (Athiya Shetty) माफी मागावी लागली. पाहूया काय होतं त्यामागचं खरं कारण?

सलमान खानला सुनिल शेट्टीची लेक अभिनेत्री आथिया शेट्टीची (Athiya Shetty) माफी मागावी लागली. पाहूया काय होतं त्यामागचं खरं कारण?

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 25 जुलै: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) चित्रपटांपेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. तो स्वत: देखील सोशल मीडियावर विविध पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. अन् त्यामुळेच जगभरातील कोट्यवधी लोक त्याला फॉलो करतात. (Salman Khan social media post) परंतु सलमान मात्र केवळ सातच अभिनेत्रींना फॉलो करतो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल. पण यामुळे सलमान खानला सुनिल शेट्टीची लेक अभिनेत्री आथिया शेट्टीची (Athiya Shetty) माफी मागावी लागली. पाहूया काय होतं त्यामागचं खरं कारण?

बिग बॉस फेम अभिनेत्रीचा भीषण कार अपघात; घटनेत मैत्रीणीचा जागीच मृत्यू

अभिनेता अरबाज खानने पिंच या चॅट शोमध्ये भाऊ सलमानची मुलाखत घेतली. त्यावेळी स्वत: सलमानने हा गंमतीशीर किस्सा सांगितला. तो म्हणाला, “सुनिल शेट्टीने मला तू आथियाला फॉलो करतोस का? असा प्रश्न विचारला होता. अर्थात मी तिला फॉलो करत नाही त्यामुळे मी नाही असं उत्तर दिलं. परंतु माझ्या उत्तरामुळे सुनिल काहीसा नाराज झाला. त्यामुळे मी मग आथियाची माफी मागितली. मी म्हणालो आथियाला सांग मला माफ करायला भविष्यात कदाचित मी तिला नक्की फॉलो करेन.” सुनिल आणि सलमानमध्ये खूप चांगली मैत्री आहे. त्यामुळे सलमान अनेकदा सुनिलची फिरकी घेताना दिसतो.

प्रशांत दामले का नाकारतात चित्रपटांच्या ऑफर? 20 वर्ष करतायेत रंगभूमीवर काम

सलमान खान केवळ या 7 अभिनेत्रींना करतो फॉलो

सलमान खानला इन्स्टाग्रामवर जवळपास 4 कोटी 20 लाख लोक फॉलो करतात. त्यामुळे तो देखील आपल्या खासगी आयुष्यातील विविध घटना सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करतो. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो. त्यांना व्यायाम करण्यासाठी प्रवृत्त करतो. शिवाय गरजवंतांना मदत देखील करतो. सलमान इन्स्टाग्रामवर केवळ 27 लोकांनाच फॉलो करतो. यामध्ये कतरिना कैफ, इसाबेल कैफ, संगीता बिजलानी, डेजी शाह, जैकलीन फर्नांडिस, यूलिया वंतूर (Iulia Vantur) आणि वालूश्चा डिसूजा या सात अभिनेत्री आहेत.

First published:

Tags: Entertainment, Katrina kaif, Salman khan