तापसीचा सिनेमा पहायचा की नाही, का होतोय #BoycottThappad सोशल मीडियावर ट्रेंड

तापसीचा सिनेमा पहायचा की नाही, का होतोय #BoycottThappad सोशल मीडियावर ट्रेंड

'थप्पड' हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही काळातच सोशल मीडियावर #BoycottThappad ट्रेंड होत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : अभिनेत्री तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेला थप्पड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाची कथा एका समान्य महिलेभोवती फिरते जिचं कुटुंब तिचं जग असतं मात्र नवऱ्यानं सर्वांसमोर कानशीलात लगावल्यानं ती त्याच्याकडून घटस्फोट घेण्याची निर्णय घेते. समाजाच्या त्याच त्या विचारसारणी पेक्षा वेगळं काहीतरी असलेल्या या सिनेमाच्या रिलीजनंतर एकीकडे काही लोक या सिनेमाचं कौतुक करत आहेत तर काहींनी मात्र सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

'थप्पड' हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही काळातच सोशल मीडियावर #BoycottThappad ट्रेंड होत आहे. या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी काही लोकांनी केली आहे. मात्र हा वाद सिनेमाशी संबंधीत नाही तर सिनेमाचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या संबंधी आहे. याचं कारण आहे मुंबईत झालेल्या CAA विरोधी रॅलीमध्ये तापसी आणि अनुभव यांचा सहभाग. काही दिवसांपूर्वी कार्टर रोडवर झालेल्या रॅलीमध्ये तापसीनं सहभागी झाली होती. याचाच आधार घेत युजर्सनी आता तापसीचा सिनेमा बंद करण्याची मागणी केली आहे.

‘बागी 3’ नंतर Hiroapanti 2 मध्ये दिसणार टायगरचा अ‍ॅक्शन अवतार, पाहा First Look

थप्पड विरोध करणाऱ्या एका युजरनं लिहिलं, आधी दीपिका आणि आता तापसी. बॉलिवूडनं पुन्हा तेच केलं. हे लोक त्यांच्या सिनेमांच्या प्रमोशनसाठी राजकीय मुद्द्यांचा वापर करतात. त्यांनी आधी या मुद्द्यांची संवेदनशील समजून घ्यायला हवी.

अमृता खानविलकरचा स्टंट पाहून आईनं लावला डोक्याला हात, हा VIDEO एकदा पाहाच

दुसऱ्या एक युजरनं लिहिलं, मी घरगुती हिंसाचारांच्या विरोधात आहे मात्र मी या सिनेमाचाही विरोध करतो. कारण मला त्या सर्व मेकर्सना धडा शिकवायचा आहे जे CAA च्या विरोधात चुकीच्या समजुती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारे इतर लोकांनीही या सिनेमाच्या विरोधात राग व्यक्त केला आहे.

तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केलं आहे. या सिनेमात पवेल गुलाटी, दिया मिर्झा, मानव कौल, कुमुद मिश्रा आणि रत्ना पाठक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमात तापसी एका हाऊस वाइफची भूमिका साकारत आहे.

एकेकाळी पती पासून वेगळी झाली होती भाग्यश्री, 30 वर्षांनी केला धक्कादायक खुलासा

First published: February 28, 2020, 5:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading