Home /News /entertainment /

Khatron Ke Khiladi 10 : अमृता खानविलकरचा स्टंट पाहून आईनं लावला डोक्याला हात, हा VIDEO एकदा पाहाच

Khatron Ke Khiladi 10 : अमृता खानविलकरचा स्टंट पाहून आईनं लावला डोक्याला हात, हा VIDEO एकदा पाहाच

मराठी इंडस्ट्रीमधून 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये सहभागी होणारी अमृता ही पहिलीच अभिनेत्री ठरली.

  मुंबई, 28 फेब्रुवारी : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर 'खतरों के खिलाडी'च्या 10 व्या सीझनमुळे सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच हा सीझन सुरू झाला. मराठी इंडस्ट्रीमधून या शोमध्ये सहभागी होणारी अमृता ही पहिलीच अभिनेत्री ठरली. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिच्या स्टंटची जोरदार चर्चा सुरू आहे. हे स्टंट करणं अमृतासाठी सोपं नक्कीच नव्हतं. पण तिनं हे आव्हान पेललं आणि पूर्णही केलं. पण जेव्हा तिच्या आईनं तिचा स्टंट पाहिला त्यावर तिची प्रतिक्रिया नेमकी कशी होती याची एक झलक अमृतानं एका व्हिडीओतून सांगितलं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अमृताच्या खतरों के खिलाडीचा एपिसोड टीव्हीवर टेलिकास्ट झाल्यानंतर तिच्या आईनं तिचे स्टंट पाहिले. त्याचा एक व्हिडीओ अमृतानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृताची आई टीव्ही समोर बसून आपल्या लेकीचा स्टंट पाहताना दिसत आहे. मध्येमध्ये अमृता तिला आपल्या स्टंट बद्दल सांगत आहे. पण आपल्या लेकीला स्टंट करताना पाहून आईच्या चेहऱ्यावर असलेलं प्रेशर या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. पण जेव्हा शेवटी अमृता उंचावरून पाण्यात उडी घेते त्यावेळी तिची आई अक्षरशः स्वतःचं डोकं पकडते. पण यासोबतच लेकीनं स्टंट पूर्ण केल्याचा आनंद सुद्धा चेहऱ्यावर झळकतो. मल्लिका शेरावतनं शेअर केला Topless Photo, हॉट लुकवर चाहते फिदा
  हा व्हिडीओ शेअर करताना अमृतान लिहिलं, ‘मी कधी विचारही केला नव्हता की मी माझ्या आयुष्यात असं काही करेन. माझ्या आईच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून मला जाणवलं की तिला माझा नक्कीच अभिमान वाटत आहे. धर्मेश माझ्या भावा जर तू नसतास तर माझं काय झालं असतं. खूप प्रेम.’ ब्रेकअपनंतर सर्वांसमोर स्टेजवर ढसाढसा रडली अभिनेत्री, सोशल मीडियावर Video Viral
  View this post on Instagram

  @khatron_ke_khiladi_10 @colorstv @dharmesh0011 @itsrohitshetty

  A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

  नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'खतरों के खिलाडी'मधील आपल्या प्रवासाबद्दल बोलताना अमृता म्हणाली, जर एखाद्या कलाकाराला या शोची ऑफर मिळत असेल तर त्यानं ही ऑफर नक्की स्वीकारायला हवी. कारण हा शो तुम्हाला लाइफ टाइम अनुभव देतो. या शोमधील प्रत्येक स्टंट एका शॉकप्रमाणे असतो. शोमध्ये अभिनेत्री करिश्मा तन्ना माझी खूप जवळची मैत्रिण झाली होती आणि आमची मैत्री आताही कायम आहे. रजनीकांत-बियर ग्रिल्स यांच्या ‘इन टू द वाइल्ड’चा धमाकेदार टीझर रिलीज, पाहा VIDEO
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या