Home /News /entertainment /

‘बागी 3’ नंतर Hiroapanti 2 मध्ये दिसणार टायगरचा अ‍ॅक्शन अवतार, पाहा First Look

‘बागी 3’ नंतर Hiroapanti 2 मध्ये दिसणार टायगरचा अ‍ॅक्शन अवतार, पाहा First Look

टायगर श्रॉफनं त्याच्या सोशल मीडियावर या सिनेमाचा पहिला लुक शेअर केला आहे.

  मुंबई, 28 फेब्रुवारी : टायगर श्रॉफनं मागच्या वर्षी वॉर या ब्लॉकबस्टर अ‍ॅक्शन सिनेमानंतर यंदा बागी 3 हा नवा अ‍ॅक्शन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. हा सिनेमा रिलीज होण्यासाठी अवघे काही दिवस उरले असतानाच टायगरनं त्याच्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमानंतर टायगर लवकरच त्याचा हिरोपंती 2 प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं. टायगर श्रॉफनं त्याच्या इन्स्टाग्रामवर या सिनेमाचा पहिला लुक शेअर केला आहे. ज्यात तो बंदुकांच्या मधून सूटा-बूटात चालताना दिसत आहे. या पोस्टर्ससोबतच या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे. हिरोपंती 2 हा सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजे 16 जुलै 2021 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2014 मध्ये टायगरनं हिरोपंती या सिनेमातून कृति सेननसोबत बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्याचाच हा दुसरा भाग आहे. एकेकाळी पती पासून वेगळी झाली होती भाग्यश्री, 30 वर्षांनी केला धक्कादायक खुलासा
  हिरोपंती 2 या सिनेमाचं दिग्दर्शन अहमद खान करत आहेत. टायगरच्या बागी 3चं दिग्दर्शनही अहमद खान यांनीच केलं आहे. बागी 3 मध्ये टायगर आणि श्रद्धा कापूरची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या सिनेमात तो सीरियात अडकलेल्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. हिरोपंती 2 बद्दल बोलायचं तर ‘द वर्ल्ड वॉन्टेड हिम डेड’ अशी या सिनेमाची टॅग लाइन आहे. म्हणजे पूर्ण जग त्याला मेलेलं पाहू इच्छिते. म्हणजे या सिनेमात तो संपूर्ण जगाशी लढताना दिसणार आहे. मात्र या सिनेमात कोणती अभिनेत्री दिसणार हे स्पष्ट झालेलं नाही. मल्लिका शेरावतनं शेअर केला Topless Photo, हॉट लुकवर चाहते फिदा ब्रेकअपनंतर सर्वांसमोर स्टेजवर ढसाढसा रडली अभिनेत्री, सोशल मीडियावर Video Viral
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Tiger Shroff

  पुढील बातम्या