Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

तापसी पन्नू ठरली सर्वात यशस्वी अभिनेत्री, अवघ्या वर्षभरात कमावले एवढे कोटी

तापसी पन्नू ठरली सर्वात यशस्वी अभिनेत्री, अवघ्या वर्षभरात कमावले एवढे कोटी

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचे मागच्या वर्षभरात एक-दोन नाही तर तब्बल 5 सिनेमा रिलीज झाले आहेत. यासोबतच ती बॉक्स ऑफिसवर एक यशस्वी अभिनेत्री ठरली आहे

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचे मागच्या वर्षभरात एक-दोन नाही तर तब्बल 5 सिनेमा रिलीज झाले आहेत. यासोबतच ती बॉक्स ऑफिसवर एक यशस्वी अभिनेत्री ठरली आहे

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचे मागच्या वर्षभरात एक-दोन नाही तर तब्बल 5 सिनेमा रिलीज झाले आहेत. यासोबतच ती बॉक्स ऑफिसवर एक यशस्वी अभिनेत्री ठरली आहे

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 7 जून : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचे मागच्या वर्षभरात एक-दोन नाही तर तब्बल 5 सिनेमा रिलीज झाले आहेत. यासोबतच ती बॉक्स ऑफिसवर एक यशस्वी अभिनेत्री ठरली आहे आणि विशेष म्हणजे स्वतः तापसी मात्र याबाबत अजिबात कल्पना सुद्धा नव्हती. जेव्हा तिला एका मीडिया रिपोर्टवरून ही गोष्ट समजली त्यावेळी ती स्वतःही हैराण झाली आहे. तिनं ट्वीट करून याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्या सोशल मीडियावरून तापसीवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. तिची 'थप्पड' को-स्टार दिया मिर्झानंही तिचं कौतुक केलं आहे.

तापसीनं मागच्या वर्षभरात वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमा केले. झूम टीव्हीनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार तापसीच्या सर्व सिनेमांनी मिळून एकूण 352 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना तापसीनं लिहिलं, ओह, अच्छा पण मला हे कधीच जाणवलं नाही. मला वाटतं मी हा क्षण क्वारंटाइनमध्ये बघायला हवा. ज्यामुळे मी या संपूर्ण प्रवासाचा आनंद घेऊ शकेन आणि हा आनंद साजरा करू शकेन.

अमिताभ-आयुष्मान यांच्या चित्रपटावर संकट; लेखिकेवर संहिता चोरल्याचा आरोप

तापसीनं वर्षभरात ज्या सिनेमांमध्ये काम केलं त्यामध्ये मिशन मंगल (Mission Mangal), गेम ओवर (Game Over), बिल्ला (Billa), सांड की आंख (Sand ki Ankh) आणि थप्पड़ (Thappad) या सिनेमांचा समावेश आहे. यातील पहिले 4 सिनेमा हे 2019 मध्ये रिलीज झाले होते. तर थप्पड यावर्षी मार्चमध्ये रिलीज झाला होता. यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम तापसीच्या सिनेमावरही झाला. पण या पाचही सिनेमात तापसीनं तिच्या अभिनयातून सर्वांची मनं जिंकली आहेत.

लग्नाच्या 3 वर्षानंतर विराट-अनुष्का घेणार घटस्फोट? काय होत आहे ट्रेंड

तापसीच्या या अचिव्हमेंटवर प्रतिक्रिया देताना थप्पड मधील तिची कोस्टार दिया मिर्झानं ट्वीट केलं आहे. तिनं लिहिलं, You must ❤️ Congratulations Lioness. Proud of you and choices you make!

तापसीच्या या यशावर तिच्या चाहत्यांनीही तिचं कौतुक केलं आहे. एका चाहत्यानं लिहिलं, 'तापसीनं बॉलिवूड अभिनेत्रीचा चेहराच बदलून टाकला आहे. तिनं स्वतःला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. तिनं दाखवून दिलं की एक महिला किती सक्षम असते. खास करून चॅलेंजिंग भूमिका या पुरुषांसाठी असतात पण तापसीनं हे समीकरण बदललं आहे.' तापसीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिच्याकडे 'रॉकेट रश्मी' आणि 'हसीन दिलरुबा' असे अनेक सिनेमा आहेत.

गर्लफ्रेंडसोबत हातात झाडू घेऊन सलमानचा VIDEO VIRAL, वाचा काय आहे प्रकरण

First published:

Tags: Bollywood, Tapasi pannu